UGC Warning : धोका!! ‘या’ विद्यापीठात प्रवेश घ्याल तर करिअरला बसेल फटका; UGC ने केलं सावध

करिअरनामा ऑनलाईन। युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनने विद्यार्थ्यांना डिजिटल युनिव्हर्सिटी ऑफ (UGC Warning) स्किल रिसर्जेन्स, वर्धा मध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन करणारी नोटीस जारी केली आहे. या नोटिसीत राज्यातील वर्धा जिल्ह्यातील एका विद्यापीठात कधीच प्रवेश न घेणायचे निर्देश UGC ने दिले आहेत. हे विद्यापीठ अमान्य आहे असं म्हणत UGC नं एक परिपत्रक काढून प्रवेश न घेण्याचं आवाहन केलं आहे. यूजीसीने या संस्थेला अवैध घोषित केले असून ते यूजीसी कायदा 1956 चे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे.

UGC ला विद्यापीठ अमान्य

या संदर्भात यूजीसीने नोटीस जारी करून लिहिले आहे की, ‘डिजिटल युनिव्हर्सिटी (UGC Warning) ऑफ स्किल रिसर्जेन्स, वर्धा, महाराष्ट्र, विविध अभ्यासक्रम चालवत आहे, जे यूजीसी कायदा 1950 चे उल्लंघन आहे.’ म्हणूनच हे विद्यापीठ अमान्य आहे आणि या विद्यपीठात कोणीही प्रवेश घेऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

यूजीसीने नियमांचा हवाला देत म्हटले आहे की, कोणत्याही केंद्र, प्रांतिक किंवा राज्य कायद्याने स्थापन न केलेल्या संस्थेला विद्यापीठ म्हणता येणार नाही. अशा स्थितीत वरील संस्थेला आपल्या नावाने विद्यापीठ स्थापन करण्याचा अधिकार नाही.

‘करिअर धोक्यात घालू नका’ (UGC Warning)

तसेच यूजीसीने विद्यार्थ्यांनी अशा संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नये, अन्यथा त्यांच्या करिअरला फटका बसू शकतो, असे आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना आपलं करिअर चांगला करायचं असेल तर या विद्यापीठात कधीच प्रवेश घेऊ नका असं आवाहन करण्यात आलं आहे. जे विद्यापीठ कायद्याचं उल्लंघन करत आहे त्या विद्यापीठात शिकून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं म्हणून या सूचना देण्यात आल्या आहेत.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com