करिअरनामा ऑनलाईन । विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC Update) देशातील 63 उच्च शिक्षण संस्थांचा डिफॉल्टर यादीत समावेश केला आहे. लोकपालाची नियुक्ती न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या यादीत पुण्यातील बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलाचा देखील समावेश आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) या संस्थांना लोकपाल नियुक्त करण्यासाठी सहा महिन्यांची नोटीस दिली होती, त्यानंतरच ही कारवाई करण्यात आली आहे.
देशातील ‘या’ शैक्षणिक संस्थांचा डिफॉल्टर यादीत समावेश
डिफॉल्टर यादीमध्ये चंदीगढचे पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर ट्रेनिंग अँड रिसर्च, गुरु तेग बहादूर विद्यापीठ, उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठ, महाराजा सुहेल देव विद्यापीठ आणि लखनऊच्या किंग जॉर्ज डेंटल विद्यापीठ अशा नावाजलेल्या संस्थांचा समावेश आहे.
‘या’ विद्यापीठांची नावे आघाडीवर (UGC Update)
डिफॉल्टर विद्यापीठांची तिसरी यादी यूजीसीचे सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्र सरकारच्या IISc आणि प्रसिद्ध मोरारजी देसाई इन्स्टिट्यूट ऑफ योगा यांची नावे आघाडीवर आहेत. या यादीत मध्य प्रदेश वैद्यकीय विज्ञान विद्यापीठ, राजा मानसिंग तोमर संगीत आणि कला विद्यापीठ, राजीव गांधी विद्यापीठ, राजमाता विजयराजे सिंधिया कृषी विद्यापीठ, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल टीचर ट्रेनिंग अँड रिसर्च भोपाळ, प्रताप युनिव्हर्सिटी आणि जोधपूर नॅशनल युनिव्हर्सिटीसह इतर विद्यापीठांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com