करिअरनामा ऑनलाईन । विद्यार्थी आणि पालकांच्या (UGC Update) तक्रारीनंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) फी परताव्याबाबत नवीन धोरण तयार केले आहे. ‘फी रिफंड पॉलिसी 2024’ पूर्वीच्या पॉलिसीपेक्षा खूपच कडक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही विद्यार्थ्याची फी कॉलेजने वेळेत परत न केल्यास संबंधित कॉलेजची मान्यताही रद्द होऊ शकते. त्यासोबतच त्या कॉलेजचे अनुदान रोखण्यापासून ते डिफॉल्टरच्या यादीत टाकण्यापर्यंतच्या तरतुदीही करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे सचिव मनीष जोशी यांनी यासंदर्भात नोटीस जारी केली आहे. या नोटीसमध्ये त्या नियमांचा उल्लेख करण्यात आला असून, त्याअंतर्गत फी न भरल्यास कॉलेजची मान्यता रद्द करण्याचा उल्लेख केला आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय या महाविद्यालयांसह इतर महाविद्यालयांनाही हा नियम लागू होणार आहे.
विद्यार्थ्यांना करावा लागेल अर्ज (UGC Update)
नोटीसमध्ये उल्लेख केल्यानुसार विद्यार्थी किंवा पालकांनाही नियमांच्या मर्यादेत अर्ज करावा लागणार आहे. उदा. शुल्काच्या परताव्याची एक निश्चित वेळ मर्यादा आहे. अशा परिस्थितीत, विद्यार्थी किंवा पालकांना या कालावधीत अर्ज करावा लागेल, जेणेकरून त्यांचे पैसे वेळेत परत मिळू शकतील.
असे आहे नवीन धोरण
फी परत न केल्यास कॉलेज प्रशासनावर UGCने कडक आराखडा तयार केला आहे. यामध्ये ऑनलाइन आणि मुक्त आणि दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रमांना शिकवण्याची मान्यता काढून घेणे, स्वायत्त संस्थेचा दर्जा काढून घेण्यापासून त्यांची नावे थकबाकीदारांच्या यादीत टाकून त्यांची नावे सार्वजनिक करण्यापर्यंतची तरतूद केली आहे.
कोणत्या परिस्थितीत फी परत देणे शक्य आहे?
युजीसीला अनेक विद्यार्थी आणि पालकांकडून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या की, शिक्षण व्यवस्थेत अनेकवेळा असे आढळून आले आहे की, जर एखाद्या विद्यार्थ्याने विशेष कारणांमुळे संस्थेतून (UGC Update) आपले नाव काढून घेतले, तर त्याला नियमानुसार कॉलेजकडून शुल्क परत करावे लागेल. अशा तक्रार करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांची संख्या सातत्याने वाढत होती.
किती आणि कधी परतावा मिळणार?
प्रवेशाची अंतिम तारीख जाहीर होण्याच्या 15 दिवस आधी किंवा तुम्ही तुमची जागा सोडल्यास १०० टक्के शुल्क परत केले जाईल; असे नोटीसमध्ये म्हटले आहे. यासह, प्रवेशाच्या अंतिम तारखेच्या अधिसूचनेपासून 15 दिवसांच्या आत 90 टक्के शुल्क परत केले जाईल. प्रवेशाची अंतिम तारीख कळविल्यानंतर १५ दिवसांच्या आत ८०% परतावा दिला जाईल १५ ते ३० दिवसांच्या दरम्यान प्रवेशानंतर एक महिना किंवा ३० दिवसांनंतर कोणतेही शुल्क परत केले जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com