UGC NET Exam 2024 : ‘या’ माध्यमातून द्यावा लागणार UGC NET पेपर; परिक्षेचा नवीन पॅटर्न जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने UGC NET 2024 (UGC NET Exam 2024) परीक्षेसंदर्भात महत्वाची घोषणा केली आहे. दि. 21 ऑगस्टला NET 2024 परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. त्यासंबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्रही जारी करण्यात आले आहे. यंदा या परीक्षेचे स्वरूप बदलण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आयोजित करण्यात आलेली पुर्नपरीक्षा नव्या माध्यमातून द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेट २०२४ परीक्षेसंदर्भात नवीन परीक्षेचे पॅटर्न जाहीर केले आहे. नवीन पॅटर्न प्रमाणे युजीसी नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (UGC NET) परीक्षा २०२४ पूर्णपणे संगणकावर आधारित असणार आहे. म्हणजेच ही परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

यापूर्वी ही परीक्षा जून महिन्यातील १८ तारखेला होणार होती. परंतु (UGC NET Exam 2024) त्यावेळी देशभरात शैक्षणिक क्षेत्रात निराशेचे वातावरण होते. त्यावेळी नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) परीक्षेचे पेपर लीक झाले होते. त्याचबरोबर युजीसी नेट परीक्षा २०२४ बाबतीतही अनेक अफवा पसरल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि निराशा निर्माण झाली होती. त्यामुळे १८ जूनला आयोजित केलेली युजीसी नेट परीक्षा स्थगित करण्यात आली. आता या परीक्षेचे आयोजन दि. २१ ऑगस्ट ते दि. ४ सप्टेंबर दरम्यान केले जात आहे.

असं आहे परीक्षेचे स्वरूप (UGC NET Exam 2024)
युजीसी नेट परीक्षा २०२४ पूर्णपणे संगणकाच्या (CBT) माध्यमातून घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा युजीसी नेटच्या जुन्या पॅटर्नने परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. काही वर्षांपासून युजीसी नेट परीक्षा लिखित स्वरूपात घेतली जात आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) या प्रक्रियेला रेड सिग्नल देत परीक्षा CBT मोडमध्ये घेण्याचे ठरवले आहे. या परीक्षेच्या माध्यमातून उमेदवाराची ज्युनिअर रिसर्च फेलोशिप तसेच असिस्टंट प्रोफेसरपदी नियुक्ती होऊ शकते. तसेच या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी भविष्यात PHD ही करू शकतात.

इथे डाउनलोड करा प्रवेशपत्र
युजीसी नेट २०२४ परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. या (UGC NET Exam 2024) परीक्षेत उपस्थित राहणार असलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र ऑनलाईन स्वरूपात डाउनलोड करता येणार आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी युनिव्हर्सिटी ग्रॅण्ट कमिशनच्या अधिकृत संकेतस्थळाला ugcnet.nta.nic.in भेट द्यायची आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com