UGC NET 2024 : UGC NET परीक्षेस अर्ज करण्यासाठी दोन दिवसाची मुदत वाढली; ‘या’ दिवशी होणार परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET 2024 ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (UGC NET 2024) एक महत्त्वाची अपडेट आहे. UGC NET जून सत्रातील परीक्षेच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. नोंदणीची प्रक्रिया संपत आली असतानाच आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) ही मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता 15 मे 2025 पर्यंत पात्र असलेल्या उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अंतर्गत वर्षातून दोन वेळा UGC NET परीक्षेचे आयोजन केले जाते. त्यानुसार आता जून सत्रातील परीक्षा याआधी दिलेल्या वेळापत्रकानुसार 16 जूनला होणार होती. परंतु आता या तारखेत देखील बदल झालेला आहे. आणि आता 18 जूनला ही परीक्षा होणार आहे. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक, पीएचडी प्रवेश यांसारख्या विविध पदांसाठी ही परीक्षा घेतली जाते.

ऑफलाईन होणार परीक्षा (UGC NET 2024)
राज्यस्तरावरील सेट परीक्षा ही नुकतीच ऑफलाइन पद्धतीने झाली आहे. परंतु आता यापुढे ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. तर यूजीसी नेट जून सत्रातील परीक्षा ही ऑफलाइन पद्धतीने ओएमआर सीटवर घेतली जाणार आहे. एकूण 83 विषयांसाठी ही परीक्षा होणार आहे.

या तारखेला होणार परीक्षा
बदललेल्या वेळापत्रकानुसार आता उमेदवारांना (UGC NET 2024) मंगळवार दि. 15 मे 2024 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. त्याचप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची तारीख ही 16 आणि 17 मे अशी असणार आहे. त्याचप्रमाणे अर्जामध्ये दुरुस्ती करायची असल्यास 18 ते 20 मे या कालावधीमध्ये आता उमेदवार दुरुस्ती करू शकतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com