UGC NET 2024 : UGC NET परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; अशी डाउनलोड करा सिटी स्लिप

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने युजीसी नेट (UGC NET 2024) परीक्षेचे वेळापत्रक प्रसिध्द केले आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांच्या निवडीसाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी येत्या 18 जून रोजी UGC NET परीक्षा घेतली जाणार आहे. यंदा प्रथमच नेट परीक्षेच्या गुणांच्या आधारे देशभरातील विद्यापीठांमधील पीएच.डी. पदवीसाठी प्रवेश घेण्यात येणार आहे. नेट परीक्षा 2 सत्रात होणार असून सकाळी 9.30 ते 12.30 यावेळेत पहिले सत्र आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत दुपारच्या सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.

पेन आणि पेपर पद्धतीने नेट परीक्षा घेतली जाईल (UGC NET 2024)
NTA च्या परिपत्रकानुसार येत्या 18 जून 2024 रोजी पेन आणि पेपर पद्धतीने नेट परीक्षा घेतली जाईल. परीक्षेच्या तारखेसह, एनटीएने परीक्षा शहर सूचना स्लिप प्रसिध्द करण्याबाबतची माहिती देखील जाहीर केली आहे. त्यानुसार अर्जदारांसाठी परीक्षा सिटी स्लिप परीक्षेच्या तारखेच्या 10 दिवस आधी म्हणजेच 8 जून रोजी उपलब्ध करून दिली जाईल. परीक्षा सिटी स्लिपद्वारे, उमेदवार त्यांच्या परीक्षेच्या शहराबद्दल माहिती मिळवू शकतात. त्यानुसार विद्यार्थी त्यांच्या प्रवासाची तयारी करू शकतात.

अशी डाउनलोड करा सिटी स्लिप
1. UGC NET परीक्षा सिटी स्लिप डाउनलोड करण्यासाठी, सर्वप्रथम विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्यावी लागेल. (UGC NET 2024)
2. विद्यार्थ्यांना वेबसाइटच्या होम पेजवर Exam City Slip च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
3. यानंतर विद्यार्थ्यांना लॉगिन तपशील (अर्ज क्रमांक, जन्मतारीख) टाकावे लागतील. यानंतर, परीक्षा सिटी स्लिप स्क्रीनवर दिसेल.
4. विद्यार्थी ही सिटी स्लिप डाउनलोड करू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com