UGC NET 2023 : प्राध्यापक होण्यासाठी वयाची अट नाही; वयाच्या 50 व्या वर्षीही देता येते UGC NET परीक्षा

करिअरनामा ऑनलाईन । UGC NET ही राष्ट्रीय स्तरावरील (UGC NET 2023) पात्रता परीक्षा आहे. याद्वारे, ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) आणि सहाय्यक प्राध्यापक पदाच्या भरतीसाठी पात्रता निश्चित केली जाते. UGC NET परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. एकदा डिसेंबरमध्ये आणि दुसऱ्यांदा जून महिन्यात ही परीक्षा होते. या परीक्षेच्या पात्रतेबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहित आहे का? जर तुम्हाला UGC NET उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक व्हायचे असेल तर त्यासाठी वयाची अट नाही. UGC NET परीक्षा आयुष्यात कधीही देता येते.

अर्ज प्रक्रिया सुरु
UGC NET परीक्षा 2023 च्या डिसेंबर सत्रासाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑक्टोबर आहे. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत क्रेडिट, डेबिट, नेटबँकिंग, UPI द्वारे फी जमा करु शकतात.
आयुष्यात कधीही देता येते परीक्षा (UGC NET 2023)
जर तुम्हाला UGC NET उत्तीर्ण झाल्यानंतर ज्युनियर रिसर्च फेलो व्हायचे असेल तर यासाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षे आहे. तसेच SC/ST/OBC (नॉन-क्रिमी लेयर)/महिला/ट्रान्सजेंडरसाठी कमाल वयोमर्यादा 35 वर्षे आहे. याशिवाय एलएलएम करणाऱ्या विद्यार्थ्यांना वयात ३ वर्षांची, माजी सैनिकांना आणि संशोधन करणाऱ्या उमेदवारांना ५ वर्षांची सूट मिळते. याशिवाय जर एखाद्याला UGC NET उत्तीर्ण होऊन सहाय्यक प्राध्यापक व्हायचे असेल तर त्यासाठी वयाची अट नाही. UGC NET परीक्षा आयुष्यात कधीही देता येते.

अशी आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता
MA, M.Sc, M.Com, M.Tech, MBA असे अभ्यासक्रम (UGC NET 2023) करणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्टर्समध्ये किमान 50 टक्के गुण असावेत. मास्टर्सच्या अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील UGC NET परीक्षेला बसू शकतात. UGC NET 2023 च्या पात्रता निकषांनुसार, ज्या पीएचडी धारकांनी 19 सप्टेंबर 1991 पूर्वी पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे त्यांना 5 टक्के गुणांची सूट दिली जाईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com