उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो, तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या – उद्धव ठाकरे

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान जगातली महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीला शक्ति देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

“शेंद्रा येथे भूमिपुत्रांना शिकविण्यासाठी आपले सरकार कौशल्य विकास संकुल उभारणार असल्याचे यावेळी ठाकरे यांनी सांगितले. तसेच “बिडकिन येथे ५०० एकरवर आपण अन्नप्रक्रिया उद्योग केंद्र उभारणार आहोत. आणि माझी इच्छा अशी आहे की जवळपास १०० एकर महिला उद्योजकांसाठी आरक्षित असली पाहिजे. असं मत ठाकरे यांनी व्यक्त केले.

दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमुक्त मी नक्कीच करणार, पण कर्जमुक्त झाल्यानंतर त्याला मला चिंतामुक्त करायचं आहे अशी ठाकरेंनी सांगितले. आपल्याकडे जे कौशल्य आहे, जी बुद्धिमत्ता आहे, त्याचा योग्य वापर आपण करू शकलो तर संपूर्ण जगाची बाजारपेठ जिंकू शकू एवढी हिंमत, ताकद आणि कौशल्य माझ्या हिंदुस्थानात, माझ्या मराठवाड्यात नक्कीच आहे.” असा विश्वासदेखील मुख्यमंत्रांनी बोलून दाखवला.

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com

हे पण वाचा –

सुवर्णसंधी ! मुंबई रेल्वेमध्ये ३५५३ पदांची होणार भरती

पुणे येथे केंद्र सरकारी आरोग्य योजनेत विविध पदांची भरती होणार

सुवर्णसंधी ! UPSC कडून ४६८ जागांची भरती

रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये ४०० जागांची भरती

आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुंबई येथे होणार भरती