राज्यातील शाळा पुन्हा बंद? कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन दरबारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सोमवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांतील शाळा अद्याप सुरुच झालेल्या नाहीत. तसेच अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील … Read more

मराठा समाजातील तरुणांना ठाकरे सरकारचा दिलासा; घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

मुंबई | मराठा समाजातील विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी आज राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा आरक्षण प्रश्नी राज्यात मराठा समाजाचं आंदोलन पुन्हा एकदा जोर धरत असताना हे आंदोलन अधिक चिघळू नये म्हणून शासनाने तातडीने हे पाऊल उचलले आहे. न्यायालयानं दिलेला स्थगिती आदेश रद्द होईपर्यंत मराठा समाजातील (एसईबीसी) विद्यार्थी तसेच युवकांना दिलासा देण्यासाठी … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची तातडीची बैठक, विद्यापीठ परिक्षाबाबत होणार महत्वाचा निर्णय 

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली आज दुपारी एक वाजता एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची मंत्रालयात ही बैठक होणार आहे. यावेळी विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार असून यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे … Read more

शाळा, महाविद्यालयांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश

मुंबई । कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी शालेय शिक्षण तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आढावा घेतला. कोरोना विषाणू प्रादुर्भावानंतरच्या काळात शिक्षण क्षेत्रावर मोठा परिणाम होणार आहे. त्यामध्ये जागतिक स्तरावरही बदल होऊ शकतात. त्यामुळे आपल्याकडेही नियमित शैक्षणिक वर्ष सुरु होईल अशा रितीने शिक्षण पद्धतीबाबत सर्वंकष आराखडा तयार … Read more

आरोग्य सेवेचा कोर्स झालाय पण नोकरी नाही? आज महाराष्ट्राला तुमची गरज – मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई । राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ हजार पार गेली आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य सेवासंबंधी कोर्स झालेल्यांची आज महाराष्ट्राला गरज असल्याचे म्हटले आहे. जर तुम्ही याआधी आरोग्य सेवेत होता मात्र आता निवृत्त झाला आहात, किंवा रिक्त पदे नसल्याने तुमच्याकडे नोकरी न्हवती तर आता अशांनी … Read more

कोरोना इफेक्ट : पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील शाळा बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

पुणे आणि पिंपरी – चिंचवड येथील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. दहावीची परीक्षा वेळापत्रकात काही बदल होणार नाही.

अधिकाऱ्यांच्या खेळामुळेच राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकरभरती – रोहित पवारांचा आरोप

अधिकाऱ्यांच्या खेळामुळेच राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकरभरती केली जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असाही प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरतीमुळे तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा – रोहित पवार

राज्यात खाजगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घातला आहे. तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा झाला आहे. असे मत रोहित पवार यांनी टिवटरद्वारे व्यक्त केले आहे.केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती कराता येते तर महाराष्टात का होऊ शकत नाही ? असा प्रश्न ही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

८७% विद्यार्थ्यांची महापरिक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी; मुख्यमंत्र्याकडून भरती प्रक्रियेस स्थगिती

मुंबई | सरकारी विभागांच्या विविध पदांची भरती महापरिक्षा पोर्टलद्वारे करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. या पोर्टलविषयी ‘एमपीएससी स्टुडंट राईट्स’ या संघटनेने समाजमाध्यमावर घेतलेल्या ऑनलाईन मतचाचणीत तब्बल ४४ हजार ४७७ उमेदवारांनी आपले मत व्यक्त केले आहे. यात ८७.२ टक्के उमेदवारांनी हे पोर्टल बंद करण्याबाबत कौल दिला आहे; तर १२.८ टक्के उमेदवारांनी सुधारणा करून … Read more

उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो, तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या – उद्धव ठाकरे

औरंगाबाद प्रतिनिधी । उद्योजकांना आम्ही प्रोत्साहन देतो,तुम्ही आमच्या भूमिपुत्रांना प्रोत्साहन द्या आणि असं जर झालं तर मराठवाडा, महाराष्ट्र, संपूर्ण हिंदुस्थान जगातली महाशक्ती आहे आणि त्या महाशक्तीला शक्ति देण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केले. ‘अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्‍स्पो-२०२०’ येथे आज मुख्यमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त … Read more