Transgender Doctors : अभिमानास्पद!! दोन तृतीय पंथी डॉक्टर होवून करणार रुग्णसेवा; कोण आहेत प्राची आणि रुथ

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महिला – पुरुषांच्या बरोबरीने आता तृतीय पंथी (Transgender Doctors) प्रत्येक क्षेत्रात नाव झळकवत आहेत.  तेलंगणातील दोन तृतीयपंथीयांनी सर्व आव्हानांना तोंड देत त्यांचं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि राज्यातील सरकारी सेवेत सामील होणारे पहिले ट्रान्सजेंडर डॉक्टर बनून इतिहास रचला आहे. प्राची राठौर आणि रुथ जॉनपॉल अशी दोन्ही ट्रान्सजेंडर डॉक्टरांची नावे आहेत. या दोन्ही डॉक्टरांनी नुकताच शासकीय उस्मानिया सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. प्राची राठोड हिला तृतीयपंथी असल्यामुळे शहरातील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नोकरीवरून काढून टाकलं होतं.

NGO आली धावून 

हैदराबाद येथील रुग्णालयात कार्यरत असताना प्राचीने इमर्जन्सी मेडिसिनचा डिप्लोमा केला. शहरातील एका सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तीन वर्षे काम केलं. पण प्राची तृतीयपंथी (Transgender Doctors) असल्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रूग्णांची संख्या कमी होऊ शकते असं हॉस्पिटलला वाटलं. त्यामुळे प्राचीला रुग्णालयातून काढून टाकण्यात आलं आहे. त्यानंतर एक NGO त्यांच्या मदतीसाठी पुढे आली आणि प्राचीला या NGO च्या क्लिनिकमध्ये नोकरी मिळाली. त्यानंतर आता प्राचीला उस्मानिया सामान्य रुग्णालयात नोकरी मिळाली आहे.

लहानपणीचं स्वप्न साकार झालं (Transgender Doctors)

प्राचीचं लहानपणी डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं, पण सोबत असणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या टोमण्यांवर मात करत 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं. प्राचीने यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “ती खरंच खूप वाईट वेळ होती. डॉक्टर होण्याचा विचार करण्याऐवजी आयुष्य कसे जगायचे आणि या गोष्टींवर मात (Transgender Doctors) कशी करायची हा मोठा प्रश्न होता. लहानपणापासून सामाजिक कलंक आणि भेदभाव याचा दृष्टीने लोक आमच्याकडे पाहायचे. मी डॉक्टर झाल्यानंतरही अनेक लोकांनी भेदभाव केला.” तृतीयपंथीयांना येणाऱ्या अडचणींचा संदर्भ देत तिने पुढे सांगितलं की, “नोकरी आणि शिक्षणात आरक्षण दिल्यास या समाजाला जीवनात पुढे जाण्यास मदत होईल.”

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com