Top Medical Colleges in India : डॉक्टर व्हायचं आहे? जाणून घ्या देशातील टॉप मेडिकल कॉलेजेस्

करिअरनामा ऑनलाईन । अनेक तरुण तरुणींना डॉक्टर होवून (Top Medical Colleges in India) करिअर करायचं असतं. हे स्वप्न साकार करण्यासाठी जर तुम्ही NEET UG परीक्षेसाठी अर्ज केला असेल, तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे. आज आपण देशातील टॉप मेडिकल कॉलेजची माहिती घेणार आहोत. या संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तुम्ही देशातील सर्वोत्तम कॉलेजमधून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. ही क्रमवारी NIRF नुसार आहे. या शैक्षणिक संस्थांच्या नावावर एक दृष्टिक्षेप टाकूया….

AIIMS दिल्ली (AIIMS Delhi) देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आघाडीचे महाविद्यालय आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने NIRF रँकिंगमध्ये 94.32% गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे. 2023 वर्षातील NIRF रँकिंगनुसार, या यादीत अमृता विश्व विद्यापीठमला सहावे स्थान मिळाले आहे. या संस्थेला 70.84% गुण मिळाले आहेत.
NIRF रँकिंग नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क ही भारतीय रँकिंग संस्था आहे. हे वेगवेगळ्या संस्थांना वेगवेगळ्या स्केलप्रमाणे रेटिंग देते. याप्रमाणे देशातील टॉप मेडिकल कॉलेजची यादी पाहण्यासाठी पुढे वाचा….

1. AIIMS Delhi (Top Medical Colleges in India)
AIIMS दिल्ली देशातील सर्वोच्च वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एक महाविद्यालय आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसने NIRF (NIRF) रँकिंगमध्ये 94.32% गुणांसह पहिले स्थान मिळवले आहे.
2. PGIMER चंदीगड
या यादीत पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च चंदीगड दुसऱ्या स्थानावर आहे. या क्रमवारीत संस्थेने 81.10% गुण मिळवले आहेत.

3. ख्रिश्चन मेडिकल कॉलेज, वेल्लोर (Top Medical Colleges in India)
या यादीत वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजला तिसरे स्थान मिळाले आहे. तामिळनाडूच्या या महाविद्यालयाने NIRF रँकिंगमध्ये 75.29% गुण मिळवले आहेत.
4. निम्हान्स बेंगळुरू
राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरो सायन्स संस्था चौथ्या क्रमांकावर आहे. बेंगळुरूच्या या संस्थेने या क्रमवारीत 72.46 गुण मिळवले आहेत.

5. JIPMER पुद्दुचेरी
जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट (Top Medical Colleges in India) मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चला पाचवे स्थान मिळाले आहे. या यादीत पुद्दुचेरीच्या या संस्थेला ७२.१०% गुण मिळाले आहेत.
6. अमृता विश्व विद्यापीठम्
2023 साठी जाहीर झालेल्या NIRF रँकिंगनुसार, अमृता विश्व विद्यापीठ सहाव्या क्रमांकावर आहे. या संस्थेला महाविद्यालयात ७०.८४% गुण मिळाले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com