Top 10 MBA Colleges in India : भारतातील टॉप 10 MBA इन्स्टिट्यूट; इथून डिग्री घ्याल तर नशीब उजळेल

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एखाद्या नामांकित शिक्षण संस्थेतून डिग्री (Top 10 MBA Colleges in India) मिळवण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते जेणेकरून इथून शिक्षण घेतल्यानंतर त्यांना चांगली नोकरी आणि पगाराचे समाधानकारक पॅकेज मिळू शकेल. जर तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केले असेल आणि उच्च शिक्षणासाठी एमबीए करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आपल्या देशात अशा काही संस्था आहेत जिथून एमबीए केल्यानंतर, विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण होताच लाखोत पगाराचे पॅकेज मिळते. आज आपण इथे देशातील काही टॉप MBA शिक्षण देणाऱ्या संस्थांची यादी पाहणार आहोत.

देशातील टॉप MBA शिक्षण देणाऱ्या संस्था (Top 10 MBA Colleges in India)
नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) ने देशातील टॉप कॉलेजेसची यादी जाहीर केली आहे. जर तुम्ही या टॉप इन्स्टिट्यूटमधून एमबीए शिक्षण पूर्ण केले तर तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नोकरीत नक्कीच चांगले पॅकेज मिळू शकते. कधी-कधी हे पॅकेज ५० लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत पोहोचते. देशातील टॉप 10 संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे…

1. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIMA)
2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगळुरू (IIMB)
3. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोझिकोड (IIMK)
4. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता
5. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली
6. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, लखनौ (Top 10 MBA Colleges in India)
7. राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था, मुंबई
8. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, इंदूर
9. एक्सएलआरआय-झेवियर स्कूल ऑफ मॅनेजमेंट, जमशेदपूर
10. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई

प्रवेश कसा मिळवायचा?
एमबीएच्या प्रवेशासाठी उमेदवारांनी पदवी (Top 10 MBA Colleges in India) पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असणे आवश्यक आहे. पदवी धारक विद्यार्थी देशभरातील एमबीए अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CAT, MAT, GMAT, XAT, CMAT परीक्षांमध्ये सहभागी होऊ शकतात. या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांनी परीक्षेत चांगली कामगिरी करून चांगली रँक मिळवणे आवश्यक आहे तरच तुम्हाला येथे प्रवेश मिळू शकतो हे लक्षात घ्यायला हवं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com