Time Management : असं करा वेळेचं व्यवस्थापन, आजच फॉलो करा या ‘3’ सवयी

करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात यशस्वी व्हावं असं प्रत्येकाला वाटतं, पण (Time Management) अनेकदा मेहनत करूनही यश मिळत नाही. यामागचे एक कारण म्हणजे वेळेचे व्यवस्थापन अनेकांना आयुष्यात खूप काही करायचे असते पण वेळेअभावी ते करू शकत नाहीत. मात्र, पुढे जाण्यासाठी आणि जीवनात यश मिळवण्यासाठी काहीतरी नवीन शिकत राहणे आवश्यक आहे. पण काहीतरी नवीन शिकायला वेळ लागतो. त्यामुळे पुढे जाण्यासाठी वेळेचे व्यवस्थापन शिकणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया वेळेचे व्यवस्थापन कसं करायचं…

1. रिमाइंडर सेट करा –

आपण जीवनात इतके व्यस्त असतो की कधीकधी आपण महत्त्वाच्या गोष्टी करणे विसरतो. विसरण्याच्या या सवयीमुळे आपल्यावर कामाचा ताण वाढतो. यानंतर, जेव्हा आपण सर्व (Time Management) काम एकत्रितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपला बराच वेळ वाया जातो. म्हणूनच तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मोबाईलमध्ये रिमाइंडर सेट करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण कराल, तेव्हा इतर गोष्टींसाठी वेळ शिल्लक राहील.

2. डेली प्लॅन तयार करा – (Time Management)

वेळेचे व्यवस्थापन शिकण्यासाठी तुम्ही डेली प्लॅन बनवून काम करणे सर्वात महत्त्वाचे आहे. यामुळे जीवनाचा समतोल राखला जातो. जेव्हा तुम्ही दैनंदिन योजनेनुसार काम करता तेव्हा तुम्हाला दिसून येईल की दिवसाच्या शेवटी तुम्हाला नवीन गोष्टी करण्यासाठी वेळ मिळेल. डेली प्लॅन बनवल्यानंतर तुम्ही त्याचे नियमानुसार पालन करणे महत्त्वाचे आहे.

3. प्रत्येक काम निश्चित मुदतीत पूर्ण करा –

आपल्या सवयींपैकी एक सवय जी आपल्याला वेळेच्या व्यवस्थापनापासून दूर ठेवते ती म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय. अनेक वेळा आपल्याला असे वाटते की कोणतेही काम कमी (Time Management) वेळेत पूर्ण होऊ शकते परंतु आपण तसे करणे टाळले पाहिजे. तुमच्या प्रत्येक कामासाठी डेडलाईन (deadline) ठरवून त्या वेळेत काम पूर्ण केले पाहिजे.

जर तुम्ही या तीन सवयी जीवनात अंगिकारल्या तर लवकरच तुम्ही वेळेचे व्यवस्थापन शिकाल आणि यशाच्या जवळ पोहोचाल.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com