Google ने लाँच केला विद्यार्थ्यांसाठी ‘द एनीवेअर स्कूल’ नावाचा नवा उपक्रम

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना (कोविड 19) च्या काळात केवळ भारतातच नव्हे तर जगभरात विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. या कोट्यवधी विद्यार्थ्यांसाठी गुगलने एक नवं पाऊल उचललं आहे. ‘द एनीवेअर स्कूल’ नावाचा नवा उपक्रम गुगलने लाँच केला आहे. यात मीट, क्लासरुम, जी सुईट आणि अन्य प्रोडक्टसह 50 नवे फिचर्स आणले आहेत. जगभरातील 250 देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येणार आहे.

गुगलने जगभरातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी एक महत्वाचं पाऊल उचललं आहे. सप्टेंबर महिन्यात, गुगल मीट या गुगलच्या अॅपवर तब्बल 49 लोक दिसतील असे बदल करण्यात येणार आहेत, तसेच मॉडरेटर नेहमी पहिल्यांदा जॉइन होऊ शकेल आणि मीटींग बंद करू शकेल अशी व्यवस्था, इन-मिटींग चॅट डिसेबल होणे या आणि अशा अनेक नव्या वैशिष्ट्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

जगभरात गुगल क्लासरुम ही वेब सर्विस शाळा कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत. विद्यार्थ्यांना फायदेशीर होईल असे ‘टू-डू विजेट ऑन क्लासेस पेज’ गुगल आणणार आहे. शिक्षक आता विद्यार्थ्यांना क्लासमध्ये इन्वाइट करण्यासाठी लिंक शेअर करू शकतात. क्लासरुम आता आणखी दहा भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे, यानंतर एकूण भाषांची संख्या 54 वर जाणार आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com