Teachers Recruitment : शिक्षकांची तब्बल 50 हजार रिक्त पदे भरणार!! राज्य सरकारची मोठी घोषणा 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीसाठी आतुर असलेल्या (Teachers Recruitment) राज्यातील शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात 30 हजार तर दुसऱ्या टप्प्यात 20 हजार शिक्षकांची पदे भरली जातील व यासंदर्भात लगेचच जीआर काढण्यात येईल, असे देखील केसरकर म्हणाले आहेत.

याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, औरंगाबाद हाय कोर्टचा स्टे या भरतीच्या संदर्भात होता. त्यामुळे या भरतीचं काम लांबलं होतं. पण सध्या काही जिल्ह्यांमध्ये शाळेत शिकवण्यासाठी शिक्षकच नाहीत; अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हाय कोर्टचा स्टे उठल्याने (Teachers Recruitment) आता शिक्षक भरतीला सुरुवात होणार असून, व त्यासोबतच नवीन शिक्षक म्हणून जॉईन करणाऱ्यांना आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये जाणार आहोत, याची चॉईस सुद्धा द्यावी लागते. यामुळे या प्रक्रियेला साधारण एक महिना लागणार असल्याचं केसरकर यांनी म्हटलं आहे.

भावी शिक्षकांना मोठा दिलासा
शिक्षणमंत्री केसरकर यांच्या घोषणेमुळे शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच याआधी केसरकर यांनी राज्यातील शिक्षकांच्या बदल्या रद्द (Teachers Recruitment) करुन गणवेश वाटप करण्याची जबाबदारी ही स्थानिक शालेय समितीवर असणार असल्याचे सांगितले होते. अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने त्यांच्यावर अधिकचा भार येत असल्याचं चित्र सध्या आहे. त्यामुळे राज्यात शिक्षक भरती होणं अत्यंत गरजेचं होतं.
शिक्षकांच्या बदली विषयी काय आहे नवीन धोरण? (Teachers Recruitment)
नव्या धोरणानुसार, एकाच शाळेवर किमान पाच वर्षे कार्यरत असलेल्या शिक्षकांचा बदली प्रक्रियेत समावेश केला आहे. या एकूण बदल्यांमध्ये संवर्ग एक मधील 6 हजार 690 आणि संवर्ग दोनमधील 3 हजार 400 शिक्षकांचा समावेश केला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com