करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी (Teachers Jobs) तुमच्याकडे चालून आली आहे. B. Ed आणि D. Ed. पदवी घेतलेले उमेदवार या संधीचा फायदा घेवू शकतात. महाराष्ट्र शासनाने नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दली घोषणा केली आहे. राज्यातील 141 खाजगी अनुदानित उच्च माध्यमिक आश्रमशाळांसाठी तब्बल 282 शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यामध्ये विज्ञान शाखेसाठी वाढीव प्रत्येकी दोन विषय शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. मंत्री अतुल सावे यांनी याबाबत माहिती दिली. त्यामुळे आता राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांना इंग्रजी व विज्ञान विषयांसाठी शिक्षक मिळणार आहेत.
यासह कला, वाणिज्य, आणि विज्ञान अशा दोन विद्या शाखेमध्ये (Teachers Jobsschool असलेल्या आश्रमशाळांसाठी एकूण आठ शिक्षकांची नेमणूक केली जाणार आहे. उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान शाखेसाठी वाढीव दोन शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. ज्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत कनिष्ठ महाविद्यालयात कला/वाणिज्य आणि विज्ञान अशा दोन विद्याशाखा आहेत; त्या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत एकूण आठ शिक्षकांची पदे अनुज्ञेय होतील.
नव्याने गणित, विज्ञान विषयासाठी मंजूर होणारी (Teachers Jobs) दोन पदे असतील. त्यापैकी कला, वाणिज्य विशेष विषय शिक्षकांची दोन आणि मराठी व इंग्रजी विषय शिक्षकांची दोन पदे असतील. याशिवाय उच्च माध्यमिक आश्रमशाळेच्या विज्ञान शाखेस गणित, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विशेष विषयांकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण चार विषय शिक्षक अनुज्ञेय राहतील.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com