करिअरनामा ऑनलाईन। देशभरातील महिलांना मोठी आनंदाची बातमी आहे. टाटा (Tata Group) ग्रुप जवळपास 45 हजार महिलांना नोकरी देणार आहे. टाटाच्या चेन्नई येथील इलेक्ट्रॉनिक प्लांट मध्ये या बम्पर भरतीचे आयोजन होणार आहे. त्यामुळे आता टाटा मध्ये महिलाराज पाहायला मिळू शकते.
टाटा कंपनीने चेन्नई येथील होसुर मध्ये 45 हजार महिलांची भरती करण्याची योजना आखली आहे. याठिकाणी आयफोनचे पार्ट बनवले जातात. Apple Inc कडून अधिक (Tata Group) व्यवसाय जिंकण्यासाठी कंपनी कडून हे पाऊल उचलले जात आहे. कोरोनामुळे चीनमध्ये अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे Apple चे उत्पादन थांबलं आहे. त्यामुळे भारताने आयफोनच्या उत्पादनावर भर दिला आहे. सध्या या कारखान्यात 10,000 कामगार काम करतात, त्यापैकी बहुतांश महिला आहेत. आता अजून 45 हजार महिलांना नोकरी देण्यात येणार आहे.
राहण्याची व जेवणाची मोफत सोय (Tata Group)
रिपोर्टनुसार, होसूर येथील टाटा समूहाचा कारखाना 500 एकरांवर पसरलेला आहे. या प्लांटमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना 16 हजार रुपये मासिक वेतन मिळणार आहे. याशिवाय राहण्याची व भोजनाची व्यवस्थाही मोफत करण्यात आली आहे. या महिलांच्या (Tata Group) शिक्षणाचा खर्चही टाटा समूह उचलणार आहे. मात्र अद्याप टाटा समूह किंवा अॅपलच्या कोणत्याही अधिकाऱ्याने या संदर्भात अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com