Talathi Bharti 2023 : तलाठी भरती परीक्षेचा निकाल ‘या’ महिन्यात होणार जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । उत्सुकता लागून (Talathi Bharti 2023) राहिलेल्या तलाठी भरती 2023 परीक्षेचा निकाल दिवाळीपर्यंत जाहीर करण्याचा राज्याच्या भूमी अभिलेख विभागाचा प्रयत्न आहे. त्यागोदर तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 57 सत्रात 8,64,960 उमेदवारांची परीक्षा घेतली होती. नोव्हेंबर 2023 मध्ये निकाल लागण्याची शक्यता आहे.

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर 14 सप्टेंबर 2023 रोजी संपली. 10 लाख 41 हजार उमेदवारापैकी 8 लाख 64 हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा (Talathi Bharti 2023) जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छानणी अंती 10 लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार 17 ते 22 ऑगस्ट 2023 (पहिला टप्पा), 26 ऑगस्ट 2023 ते 02 सप्टेंबर 2023 (दुसरा टप्पा) आणि 4 ते 14 सप्टेंबर 2023 (तिसरा टप्पा) असे एकूण 57 शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली.

TCS कडून उत्तरपत्रिका जाहीर करण्याची मागणी भूमी अभिलेख विभागाकडे केली जाणार आहे त्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांच्या लॉगइनमध्ये प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका दिसणार (Talathi Bharti 2023) आहे त्यानुसार उमेदवारांना काही आक्षेप असल्यास ते  नोंदविता येणार आहेत. त्याकरिता उमेदवारांना मुदत दिली जाणार आहे. प्राप्त आक्षेप, हरकती टीसीएस कंपनीच्या समितीकडे जाऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर दिवाळी पर्यंत परीक्षेचा निकाल लावण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि परीक्षेचे राज्य समन्वयक आनंद रायते यांनी दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com