Talathi Bharti 2023 : तलाठी भरती पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल; पहा बदललेली वेळ

करिअरनामा ऑनलाईन । तलाठी भरतीसाठी राज्यभरात (Talathi Bharti 2023) सुरु असलेल्या परीक्षेच्या वेळी विद्यार्थांचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा पार पडत आहे. मात्र राज्यातील संभाजीनगर, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यात परीक्षेआधीच सर्व्हर डाऊन झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर तलाठी पेपरच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला आहे.

तलाठी पेपरची वेळ (Talathi Bharti 2023) बदलण्यात आली असून आज (दि. 21 ऑगस्ट) दुपारी 12.30 ते 2.30 या वेळेत होणाऱ्या पेपरची वेळ बदलण्यात आली आहे. हा पेपर आता दुपारी 2 ते 4 या वेळेत होणार होणार आहे. पुण्यातील तलाठी परिक्षेच्या सेंटर्सवर हे बोर्ड लावण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com