Talathi Bharti 2023 : अबब!! तलाठी भरतीच्या फी मधून सरकारच्या तिजोरीत 127 कोटी जमा; 4644 पदांसाठी आले 13 लाख अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकर भरतीची सगळेच तरुण (Talathi Bharti 2023) आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या राज्य सरकारने तलाठी भरती जाहिर केली आहे. या भरतीत लाखो तरुण आपले नशीब आजमावणार आहेत; कारण 4644 जागांसाठी तब्बल 13 लाखांच्या जवळपास अर्ज दाखल झाले आहेत. या भरतीच्या परीक्षा फी पोटी शासनाच्या तिजोरीत 127 कोटी जमा झाले आहेत. पीएचडी धारक, इंजिनिअर, एमबीए झालेले उच्चशिक्षित तरुणही तलाठी व्हायला निघाले आहेत; ही बाब विशेष म्हणावी लागेल.

20 पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार परीक्षा
4 वर्षापासून रखडलेल्या तलाठी भरतीला यावर्षी मुहूर्त लागला आहे. सरकारने 4644 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. २६ जूनपासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. या भरतीसाठी आजपर्यंत 13 लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. एकूण जागेच्या तुलनेत आलेल्या अर्जाचा विचार केला तर एका जागेसाठी 275 उमेदवार आहेत. त्यामुळे प्रचंड स्पर्धा या परीक्षेसाठी निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून रखडलेली शासकीय भरती. म्हणूनच शासनाला ही परीक्षा 20 पेक्षा अधिक दिवस घ्यावी लागणार आहे.

फीमुळे महिन्याचे बजेट कोलमडलं (Talathi Bharti 2023)
तलाठी पदासाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी १००० रुपये तर राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा फी आकारण्यात आली आहे. २३ जुलैपर्यंत शासनाकडे १२ लाख ७७ हजार १०० अर्ज आले आहेत. ज्याची एकूण रक्कम तब्बल १२७ कोटी रुपये हे शासकीय तिजोरीत जमा झाले आहेत. महत्वाचे म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात फी मिळूनही परीक्षा पारदर्शक होत नाहीत, हा मागच्या काही परीक्षांचा अनुभव आहे. उस्मानाबाद मधील (Talathi Bharti 2023) बाबासाहेब गाढवे यांनी आपल्यासह पत्नीचाही तलाठी परीक्षेसाठी अर्ज केला आहे. दोघांनी एकाचवेळी अर्ज केल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ठेवलेले दोन ते अडीच हजार रुपये फी साठी भरावे लागल्यामुळे खर्चाचा भुर्दंड त्यांना सहन करावा लागला आहे. उस्मानाबादच्या सह्याद्री रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करणारा रामेश्वर बाबासाहेब कांबळे हे ग्रॅज्युएट आहेत, आपल्या आई-वडिलांचे छत्र हरपल्याने स्वतः काम करून ते कुटुंब चालवतात. आता त्यांनी तलाठी पदासाठी फॉर्म भरला आहे, ज्यामुळे त्याला मिळणाऱ्या पगारातील दीड हजाराची पदरमोड करावी लागली आहे.

उच्च शिक्षित तरुणांनी केले अर्ज
राज्यात ७५ हजारांची पदभरती करण्याची घोषणा झाली, मात्र ही घोषणा हवेतच विरली. त्यानंतर होणारी ही पहिलीच भरती आहे. या भरतीमुळे वय वाढत चाललेल्या अनेक तरुणांना आशेचा किरण निर्माण झाला आहे. त्यामुळेच तलाठी पदासाठी अनेक अभियांत्रिकी, व्यवस्थापन, संगणक शास्त्र, विज्ञान, कला, वाणिज्य, बीएस्सी ऍग्री, एमएसस्सी बायोटेक, LLB आदी शाखांमध्ये पदव्युत्तर पदवीधारकांनीही अर्ज केले (Talathi Bharti 2023) आहेत. वय वाढत असल्याने आयुष्यात काही ना काही तरी व्हावे म्हणून हा खटाटोप करत असल्याचे सांगून हे उच्चशिक्षित तरुण नोकर भरतीच्या अनुषंगे सरकारी धोरणावर संताप व्यक्त करत आहेत. एकूणच अनेक शासकीय कार्यालयांमध्ये हजारो पदे रिक्त असताना सरकार वर्षांनुवर्षे शासकीय भरती काढत नाहीत. अन् काढली की बेरोजगार तरुण ती मिळवण्यासाठी तुटून पडतात; असे सर्वत्र चित्र आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com