पाचवीचे वर्ग २१ जुलैपासून तर दहावी, बारावीचे वर्ग ५ ऑगस्टपासून होणार सुरु – बच्चू कडू

करिअरनामा ऑनलाईन । राज्यातील कोरोना परिस्थिती अद्याप बदलली नसल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा कधी सुरु होतील याबाबत अद्याप काही तारीख निश्चित झालेली नाही पण विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन पद्धतीने वर्ग सुरु करण्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले होते. मात्र जुलै महिन्यातही शाळा सुरु झाल्या नाही आहेत. आता विद्यार्थ्यांच्या … Read more

ATKT विद्यार्थ्यांना लाॅटरी! सरासरी गुणांद्वारा पास करणार – उदय सामंत

मुंबई | राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत सरकारचा सावळा गोंधळ सुरु अाहे. केंद्रीय गृहखात्याने विद्यापीठ परिक्षांना परवानगी दिल्यानंतर युजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्याबाबत राज्य सरकारला अधिसुचना पाठवली होती. मात्र परिक्षा न घेण्यावर राज्य सरकार ठाम असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना सरासरी गुणांद्वारे पास करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे ATKT च्या विद्यार्थ्यांना … Read more

भजी विक्रेता ते उद्योग क्षेत्रातील बादशहा; ३०० रुपयांची नोकरी करणारे धीरूभाई अंबानी असे झाले कोट्याधीश  

करिअरनामा ऑनलाईन। धीरूभाई अंबानी हे नाव भारतातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे. केवळ मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी स्वतःचे मोठे उद्योगविश्व निर्माण केले आहे. त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. भजी विकणारे धीरूभाई अंबानी उद्योग जगतातील बादशहा कसे बनले ते आज जाणून घेऊयात. धीरुभाई यांचे मूळ नाव धीरजलाल हिराचंद अंबानी असे आहे. २८ डिसेंबर १९३२ रोजी गुजरातमधील … Read more

मोठी बातमी! विद्यापीठ परिक्षांसाठी गृहमंत्रालयाची परवानगी; विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावे

मुंबई | व्यवसायिक, अव्यवसायिक पदवीच्या ७ ते ८ लाख विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला लागावे लागणार आहे. कारण विद्यापीठ परिक्षांसाठी गृहमंत्रालयाने परवानगी दिली आहे. UGC च्या गाईडलाईन नुसार विद्यापीठांना आता परिक्षा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. परिक्षा घेताना मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना पास केले तर सदर विद्यार्थ्यांना कोरोना बँच म्हणुन … Read more

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाईन परीक्षेला विरोध 

करिअरनामा ऑनलाईन। दिल्ली विद्यापीठातले विद्यार्थी ऑनलाईन परीक्षेला विरोध करत आहेत. ओपन बुक मॉक टेस्ट पहिल्याच दिवशी अयशस्वी झाली आहे.  पोर्टल क्रॅश झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पेपर अपलोड आणि डाउनलोड करण्यास अडचणी येत आहेत. मॉक टेस्ट देण्याच्या जागी विद्यार्थी तांत्रिक अडचणींमध्येच अडकून गेले. मॉक टेस्ट मध्ये आलेल्या अडचणीनंतर ओपन बुक टेस्ट रद्द करण्याची मागणी केली जात आहे. विद्यार्थी ट्विटर … Read more

CA परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल, आता नोव्हेंबरमध्ये होणार परीक्षा

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काल (३ जुलै) JEE आणि NEET च्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता CAच्या मे २०२० च्या सीए परीक्षा रद्द करण्यात आल्या असून त्या नोव्हेंबर २०२० मध्ये पुढील परीक्षा होणार आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने काल (३ जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात ट्विटरवर पत्रक जारी करुन ही माहिती दिली. याआधी सीए … Read more

११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया १५ जुलैपासून होणार सुरु

करिअरनामा ऑनलाईन । यंदा संचारबंदीमुळे शाळा महाविद्यालये उशिरा सुरु होणार आहेत. अद्याप अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली नाही आहे. त्यामुळे ही प्रक्रिया सुरु होण्याची वाट बरेच विद्यार्थी आणि पालक बघत होते. पुणे व पिंपरी चिंचवड भागातील प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून त्यासाठीचा शासन निर्णय जारी करण्यात … Read more

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम परीक्षाही ऐच्छिकच; ठाकरे सरकारचा अंतिम निर्णय

मुंबई । विद्यापीठांच्या अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांप्रमाणेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. तर बॅकलॉग असलेल्या विद्यार्थ्यांबाबत कुलगुरु आणि अधिकारी यांची सरकारस्तरावर बैठक घेऊन दोन-तीन दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे, असे सामंत यांनी … Read more

अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत मोठा निर्णय; राज्यमंत्री तनपुरे यांचा ATKT विद्यार्थ्यांनाही दिलासा

मुंबई | महाविकास आघाडीने विद्यार्थी हित लक्षात घेऊन अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु राज्यपालांच्या परिक्षा घेण्याच्या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने असल्याचे म्हणत अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्याचे सांगितले आहे. महाविकासआघाडी सरकार विद्यार्थ्यांच्या बाजूने!अंतिम वर्ष परीक्षांबाबत … Read more

मोठी बातमी! राज्यात या तारखेपासून शाळा सुरु; सरकारकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई | राज्यात कोरोना आणि त्याच्या प्रादुर्भावाने धुमाकूळ घातला आहे. अशा परिस्थितीत सोमवारपासून ऑनलाइन शाळा सुरू केल्या जाणार आहेत. मात्र त्याला कडाडून विरोध सुरू होत असतानाच आज शालेय शिक्षण विभागाने शाळा जुलै महिन्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला असून यासाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले जात आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन … Read more