HSC Result 2020 | जुळ्या बहिणींचे अनोखे जुळे यश…

मुंबई | नालासोपा-यात राहणा-या आणि वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातील विज्ञात शाखेत शिकणा-या आकांक्षा आणि अक्षता या जुळ्या बहिणींनी अनोखे जुळे यश मिळविल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या दोघी इयत्ता बारावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या आहेत. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी दहावीला देखील दोन्ही जुळ्या बहिणी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण … Read more

HSC Result 2020 | राज्याचा बारावीचा निकाल 90.66 टक्के

मुंबई | राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. मागच्या वर्षापेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यावेळी बारावी निकालात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 95.89 टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी 88.18 टक्के लागला आहे. राज्याचा बारावीचा विभागनिहाय निकाल :कोकण – 95.89 … Read more

बारावी चा निकाल म्हणजे आयुष्य नव्हे; IAS अधिकार्‍यांने शेयर केलं स्वत: गुणपत्रक

हॅलो करिअरनामा ।आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक वेळा परीक्षेतील गुणांना महत्व दिले जाते. गुणांवर मुलांचे भवितव्य आहे असे वारंवार सांगितलं जातं. त्यासाठी आई वडील आणि नातेवाईक मुलांच्या मागे अभ्यास करण्यासाठी तगादा लावतात. त्यामुळे अनेक वेळा मुलं ताण तणावाखाली जाऊन चुकीचे पाऊल टाकतात. दहावी आणि बारावी त्यात बोर्डचा निकाल म्हंटल की मुलांना गुणांची आणि भविष्याची चिंता अधिक … Read more

महाराष्ट्र स्टेट बोर्ड 12 वी चा निकाल कधी? शिक्षणमंत्री म्हणतात…

मुंबई । दोन दिवसांपूर्वी सीबीएससी (CBSC ) आणि आयसीएससी( ICSC) बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. आज किंवा उद्या सायंकाळपर्यंत CBSC दहावी चा निकाल जाहीर केला जाईल . यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परिक्षेचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि परिक्षार्थ्यांचं लक्ष लागलं आहे. बारावीची परीक्षा हि … Read more

CBSC Results 2020 | दहावी, बारावीचे निकाल जाहीर; ‘इथे’ येणार पाहता

नवी दिल्ली | CBSE (Central Board of Secondary Education, CBSE) बोर्डाचा नुकताच निकाल जाहीर झाला आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे बारावीच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. बारावीचे विद्यार्थी CBSE बोर्डाचे निकाल cbseresults.nic.in च्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर लागेल. रोल … Read more