बारावी चा निकाल म्हणजे आयुष्य नव्हे; IAS अधिकार्‍यांने शेयर केलं स्वत: गुणपत्रक

हॅलो करिअरनामा ।आजच्या स्पर्धेच्या युगात अनेक वेळा परीक्षेतील गुणांना महत्व दिले जाते. गुणांवर मुलांचे भवितव्य आहे असे वारंवार सांगितलं जातं. त्यासाठी आई वडील आणि नातेवाईक मुलांच्या मागे अभ्यास करण्यासाठी तगादा लावतात. त्यामुळे अनेक वेळा मुलं ताण तणावाखाली जाऊन चुकीचे पाऊल टाकतात.

दहावी आणि बारावी त्यात बोर्डचा निकाल म्हंटल की मुलांना गुणांची आणि भविष्याची चिंता अधिक असते. निकाला पेक्षा तुम्ही तुमच्या कर्तुत्वाला महत्व द्या आणि कर्तृत्वावर विश्वास ठेवा. निकालाबाबत ताण तणाव घेण्याची काही गरज नाही अश्या आशयाची पोस्ट अहमदाबाद येथील एका आयएस अधिकाऱ्याने केली आहे. त्यांनी २ ००२ मधील आपल्या बारावीच्या मार्क सीट ची प्रत शेअर करत, गुणांवर मुलाचे भवितव्य अवलंबून नसते. या पोस्ट मध्ये त्यांना केवळ केमिस्ट्री मध्ये अवघे २४ गुण मिळाल्याचे दिसत आहे.

हे पण वाचा -
1 of 15

मुलांनी दहावी आणि बारावी च्या२ ००२ निकालाची काळजी करण्याची जास्त गरज नाही हे सांगण्यासाठी स्वतः आयएस अधिकारी असलेलं नितीन बागवान यांनी स्वतःच्या निकालाची प्रत ट्विट केली आहे.ते रासायन शास्त्रात काठावर पास झाले आहेत. त्यामुळे गुणांवर काही अवलंबून नसते कारण आयुष्य हे बोर्डाच्या निकाला पेक्षा खूप महत्त्वाचं आहे.

नितीन यांनी ट्विट मध्ये असे लिहले आहे की, “मला माझ्या आयुष्यात 12 वीला फक्त उत्तीर्ण होण्यासाठी लागणाऱ्या गुणांपैकी 1 गुण जास्त होता .परंतु या गुणांमुळे मी आयुष्यात काय करणार यावर परिणाम झाला नाही. आयुष्य हे बोर्डच्या निकाला पेक्षा खूप मोठं आहे. निकाल म्हणजे फक्त स्वतःमध्ये डोकावून पाहण्याची संधी आहे. त्यामुळे स्वतःला दोष देत बसू नका. ” यावर सर्व पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी विचार करण्याची गरज आहे.

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com