शाळा कधी सुरु होणार? शिक्षण आयुक्त म्हणतात…

पुणे । देशातील कोरोनाची स्थिती पाहून केंद्राने देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. याला आता दोन महिने उलटून गेले आहेत. संचारबंदीत सर्व उद्योग व्यासायांसोबत, शाळा, महाविद्यालये तसेच उत्तर शैक्षणिक संस्थाही बंद करण्यात आल्या होत्या. राज्यात १५ जून पासून शाळा सुरु होतील अशा चर्चा होत्या. मात्र महाराष्ट्राची सद्यस्थिती संक्रमणाच्या दृष्टीने धोकादायक आहे. प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती वेगळी असली … Read more

१० वी, १२ वी च्या परीक्षा घेण्याबाबत गृहखात्याकडून राज्य सरकारांना परवानगी

नवी दिल्ली । देशात कोरोना रुग्णांची संख्या लाख पार करून गेली आहे. सर्वत्र विषाणूचा संसर्ग पाहता संचारबंदीचे नियम कडक करण्यात आले होते. शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली होती. आणि विषाणू संक्रमणाच्या धर्तीवर सीबीएसई/ आयसीएसई तसेच राज्य सरकारच्या बोर्डाच्या, १० वी, १२ वीच्या परीक्षा निलंबित करण्यात आल्या होत्या. सीबीएसई आणि राज्य सरकारच्या बोर्डाकडून गृह मंत्रालयाला या परीक्षा घेण्याच्या … Read more

कोणतीही परीक्षा न घेता मेडिकलच्या 30 हजार जागा भरणार- राजेश टोपे

मुंबई | राज्य सरकारने वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा महिनाभरात भरण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे कोणतीही परीक्षा न घेता, पूर्वीच्या शैक्षणिक पातळीवरील परीक्षांवरुन या जागा तातडीने भरल्या जातील, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभाग तसंच राज्यभरातील विविध महापालिका रुग्णालयांमध्ये जवळपास 30 हजार जागा रिक्त आहेत. या सर्व … Read more

पालकांना दिलासा; शाळांना ‘फी’ वाढ न करण्याचे राज्य शासनाचे आदेश

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळं आर्थिक संकट निर्माण झालेले आहेत. अशा वेळी राज्य शासनाने पालकांना दिलासा देणारा एक निर्णय घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी फी वाढ न करण्याचे निर्देश राज्य शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व शाळांना देण्यात आले आहेत. राज्यात सध्या लॉकडाउन सुरु असल्यानं काही शैक्षणिक संस्था पालकांना विद्यार्थ्यांची फी भरण्याची … Read more

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा! शेवटचे सेमिस्टर सोडून सर्व परीक्षा रद्द – उदय सामंत

मुंबई । लॉकडाऊनमुळे राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये परीक्षांसंबंधी संभ्रम होता. त्यामुळं राज्य सरकारनं याबाबत निर्णय घेतला आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षा सोडून अन्य परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. UGC ने दिलेल्या निर्देशांनुसार सगळे निर्णय घेण्यात येत आहेत असंही उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. या निर्देशांनुसार … Read more

पुण्यात अडकलेल्या स्पर्धापरिक्षा विद्यार्थ्यांसाठी खूषखबर; आज पहिली बस सुटणार

पुणे प्रतिनिधी | लाॅकडाउनमुळे राज्यातील विविध भागांत अनेकजण अडकून पडले आहेत. अशांसाठी एसटी बस ची सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी दिली होती. त्यानुसार आज पुण्यातून विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी पहिली बस नगरला जाणार असल्याचे समजत आहे. या निर्णयामुळे पुण्यात अडकून पडलेल्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. पुण्यात सुमारे … Read more

विद्यापीठ आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसांत जाहीर होणार- उदय सामंत

मुंबई । विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षेचे वेळापत्रक दोन दिवसात जाहीर करण्यात येईल. राज्यातील सर्व कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे परीक्षेसंदर्भात नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. बैठकीत पदवी आणि पदवीत्तर शेवटच्या वर्षाच्या परीक्षा 1 जुलै ते … Read more

दिल्लीत UPSC करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करा – सुप्रिया सुळे

मुंबई । व्हायरस विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देश सध्या लॉकडाउन आहे. यामुळे देशाच्या अनेक भागांत स्थलांतरित कामगार,पर्यटक अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील अनेक मराठी विद्यार्थी दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी जातात. आता लॉकडाउनमूळे दिल्लीत अडकलेल्या अशा विद्यार्थ्यांकरिता विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. युपीएससी परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी दिल्ली … Read more

हुश्श! एकदाचं ठरलं; विद्यापीठांच्या परीक्षा जुलैमध्ये

नवी दिल्ली | विद्यापीठांना सोयीनुसार जुलैमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन परीक्षा घेता येतील. त्यासाठी कोविड १९ च्या आगामी काळातल्या परिस्थितीचा आढावा घेऊन परीक्षेचा कालावधी २ तासापर्यंत कमी करता येईल, अशी शिफारस विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात युजीसीनं केली आहे. पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन एकतर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे केले जाऊ शकते किंवा मागील सत्रातील त्यांच्या … Read more

कोरोनामुळे यंदाच्या UPSC, MPSC च्या परिक्षा रद्द? जाणुन घ्या सत्य

मुंबई | कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ११ हजारांवर गेली आहे तर राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार पार गेली आहे. अशात एका मराठी वृत्तवाहिनीने कोरोनामुळे यंदाच्या युपीएससी, एमपीएससी परिक्षा रद्द झाल्याची बातमी दिली. मात्र सदर बातमी फेक असल्याचा दावा प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोच्या फेक्ट चेक विंगने केला आहे. Claim: A Marathi TV … Read more