कोरोनाचा धसका : शिक्षकांनाही करायचंय ‘वर्क फ्रॉम होम’
कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. दहावीची परीक्षा नियमित चालू आहेत. त्यामुळे शिक्षकांनाही शाळेत उपस्थित राहावे लागते मात्र परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी द्यावे अशी विनंती शिक्षक परिषदेने केली आहे.