सर्व शाळा आणि विद्यापीठांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर! छत्तीसगड सरकारचा निर्णय

रायपूर | चीन नंतर आता भारतातही कोरोना विषाणुने थैमान घातले आहे. देशात आत्तापर्यंत ८२ हून अधिक कोरोना रुग्न सापडले आहेत. यापार्श्वभुमीवर खबरदारी म्हणुन छत्तीसगड सरकारने शाळा आणि विद्यापीठांना ३१ मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे.

छत्तीसगड सरकारने कोरोना विषाणुच्या संसर्गापासून विद्यार्थ्यांना वाचवण्याकरता मोठा निर्णय घेतला आहे. सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापिठे यांनी ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबतीत खबरदारी म्हणुन सदर निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे.

दरम्याम जगभरात एकुण २९ कोटी विद्यार्थी कोरोनामुळव शाळाबाह्य झाले आहेत. मुंबई, नागपूर, पिंपरी चिंचवड येथील शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.