कोरोनाचा धसका : शिक्षकांनाही करायचंय ‘वर्क फ्रॉम होम’

करिअरनामा । कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे ३१ मार्चपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला आहे. दहावीची परीक्षा नियमित चालू आहेत. त्यामुळे शिक्षकांनाही शाळेत उपस्थित राहावे लागते. मात्र परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासण्यासाठी घरी द्यावी अशी विनंती शिक्षक परिषदेने केली आहे.

दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ज्या शिक्षकांकडे आल्या आहेत, त्यांना घरूनच पेपर तपासणीचे काम करू द्यावे यासंदर्भातील पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाला पाठवले आहे.

राज्यसरकारने  कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद ठेवण्याचे आदेश देऊनही मुंबईतील काही शाळांनी इयत्ता नववीच्या वार्षिक परीक्षा सुरु ठेवून विद्यार्थी व शिक्षकांना वेठीस धरले आहे. शासन निर्णयाचे उघडपणे उल्लंघन होत असल्याने संबंधितांना आवश्यक व स्पष्ट सूचना आपल्या स्तरावरून देण्यात याव्यात, अशी विनंती  महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांना केली आहे.

नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”