Success Tips : ‘या’ सवयी ठरतील करिअरसाठी धोक्याची घंटा, नेहमी राहा ‘फोकस मोड’मध्ये

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। करिअर घडवायचं असो की, अभ्यासात यश मिळवायचं असो (Success Tips) तुमचं निश्चित ध्येयावर लक्ष केंद्रीत होणं आवश्यक आहे. ज्याप्रमाणे मोबाइल फोनमध्ये फोकस मोड फीचर हे यूजर्सचं लक्ष विचलित होऊ नये म्हणून वापरले जाते, त्याचप्रमाणे ‘फोकस मोड’मध्ये राहूनच करिअर आणि अभ्यासात यश मिळते. एकदा तुम्ही लक्ष केंद्रित केले की गोष्टी सोप्या होतात. अगदी अवघड कामेही सोपी वाटू लागतात.

मात्र, याऐवजी लक्ष न देता, अस्वस्थता, चिडचिडेपणा केल्यास काम पूर्ण होत नाही. खरं तर एखाद्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही, त्यासाठी सतत सराव करावा लागतो. तसेच (Success Tips) अशा काही सवयी आहेत ज्या लक्ष केंद्रीत करण्यात सर्वात मोठा अडथळा आहेत. आता आम्ही आपल्याला अशा 8 सवयींबाबत सांगणार आहोत ज्या तुमचा फोकस बिघडवण्यात सर्वात महत्वाची भूमिका बजावतात.

‘या’ सवयी तुमचं करिअर करतात उध्वस्त (Success Tips)

  1. जर तुम्ही तुमच्या मोबाइल आणि इंटरनेटला सतत चिकटलेले असाल तर समजा की, तुम्ही फोकस मोडमध्ये नाहीत. अशा लोकांना दर 5 मिनिटांनी सतत आपला स्मार्टफोन तपासण्याची वाईट सवय असते, ज्यामुळे वेळही वाया जातो.

2. जर तुम्हाला नाश्ता टाळण्याची सवय असेल तर तुम्ही जास्त काळ फोकस मोडमध्ये राहू शकत नाही. कारण अन्न न खाल्ल्याने मेंदूला ग्लुकोज मिळत नाही आणि त्याच्या कमतरतेमुळे मेंदू चांगल्या स्थितीत काम करत नाही.

3. तुम्हीही खूप जंक फूड खाता का? जर होय, तर जाणून (Success Tips) घ्या की बहुतेक जंक फूड हे शिळे आणि खूप तळलेले असते, जे तुम्हाला आळशी, आजारी बनवू शकते. त्यामुळे फोकस कमी होतो.

4. जर तुम्ही अतिउत्साही लोकांपैकी एक असाल तर हे जाणून घ्या की ही सवय तुम्हाला आनंदी बनवण्याव्यतिरिक्त कशावरही लक्ष केंद्रीत करू देणार नाही. जीवनात उत्साही असणे महत्त्वाचे आहे, परंतु अतिउत्साह असणं चांगलं नाही.

5. जर तुम्ही तुमचा बहुतेक वेळ नातेसंबंध आणि मैत्री टिकवून ठेवण्यासाठी घालवत असाल, तर जाणून घ्या की, जास्त संवाद देखील तुमचा फोकस कमी करुन टाकतो. लक्षात ठेवा, कॅज्युअल मित्रांची एक लांबलचक यादी असेल तर त्यापैकी बहुतेक जण हे दिशाभूल करणारे असू शकतात.

6. एखाद्याबद्दल संशय किंवा मत्सर या भावना ठेवल्यास देखील तुमचा फोकस कमी होतो. नेहमी सकारात्मक विचार करा. प्रत्येकाबद्दल चांगल्या भावना ठेवा आणि इतर कोणाशीही (Success Tips) स्वतःची तुलना करणे बंद करा.

7. मल्टी-टास्किंग हे देखील तुमच्या करिअरवरही वाईट परिणाम करु शकतं. जेव्हा मल्टीटास्किंग सुरू केले जाते, तेव्हा कोणत्याही एका कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकत नाही, ज्यामुळे कामाची कार्यक्षमता संपते.

8. असं मानलं जातं की, यशाची भावना असल्याने तुमचा फोकस वाढतो. पण यशाचा जास्त विचार केल्याने ना तुम्ही एकाग्र होऊ शकता ना तुम्ही यशस्वी होऊ शकत. म्हणून तुमच्या ‘कर्मावर’ लक्ष केंद्रीत करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com