करिअरनामा ऑनलाईन | विशालच्या घरची परिस्थिती तशी हालाखीची. कुटुंबियांच्या (Success Story) दोनवेळच्या जेवणासाठी आई शिवणकाम करायची आणि वडील गवंडीकाम करायचे. दोघांनीही आपल्या लेकानं मोठं होऊन अधिकारी व्हावं हे स्वप्न पाहिलेलं. मग न खचता त्यांनी लेकाला पुढे शिकवलं आणि लेकानंही अधिकारी होऊन आई – वडिलांचं स्वप्न साकार केलं. ही गोष्ट आहे अहमदनगर येथील विशाल पवार या तरुणाची. त्यांनी कष्ट करून देशातील सर्वात कठीण UPSC ची CDS परिक्षा पास केली असून भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्ती मिळवली आहे. पाहूया त्यांनी हे यश कसं मिळवलं…
10 बाय 10 च्या खोलीत राहून शिक्षण केले पूर्ण
विशाल हे अहमदनगर जिल्ह्यातील बुरूडगाव येथे 10 बाय 10 च्या खोलीत (Success Story) वडील राजेंद्र, आई सुनिता आणि आपल्या आजीसह राहतात. त्यांनी विशालने प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परिक्षेत यश मिळवले आहे. त्याचे पहिले ते चौथीचे प्राथमिक शिक्षण हे बुरूडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर 10 वी पर्यंतचे शिक्षण हे अहमदनगरच्या रुपीबाई बोरा विद्यालयात झाले.
शिकण्यासाठी नोकरी केली
10 वी नंतर विशाल यांनी अहमदनगरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. घरची परिस्थिती साधारण असल्याने खासगी कोचिंग (Success Story) क्लासेस लावणे शक्य नव्हते. त्यामुळे विशाल यांनी एक वर्ष खासगी कंपनीत नोकरी केली. त्यातून पैसे जमा करून पुण्याच्या काशीबाई नवले कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. पदवीचे शिक्षण सुरू असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.
अपयशाने खचला नाही
विशाल यांनी पहिल्या प्रयत्नात UPSC ची परीक्षा दिली मात्र, त्याला अपशय आलं. अपयशाने मात्र, तो खचून गेला नाही तर त्यांनी 10 एप्रिलला पुन्हा CDSची परीक्षा दिली. यामध्ये (Success Story) त्यांना यश मिळालं. सप्टेंबर महिन्यात बंगळुरू येथे त्यांची मुलाखत झाली. त्यातही त्यांनी यश मिळवलं. यानंतर मेडीकल आणि इतर सर्व प्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या.
भारतीय सैन्यदलात केलं टॉप
विशाल यांनी भारतीय सैन्यदलाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे. या परिक्षेत त्यांनी संपूर्ण देशात टॉप 100 मध्ये 61 वा क्रमांक पटकावला आहे; तर इंडियन नेव्हीमध्ये टॉप 100 मध्ये 20 वा नंबर आला आहे. अगदी लहानपणापासूनच आर्मीत जाण्याचे विशाल यांचे (Success Story) स्वप्न होते. ते स्वप्न आता सत्यात उतरले आहे. हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतही त्याने न डगमगता प्रामाणिकपणे कष्ट केले. 10 बाय 10 च्या खोलीत अभ्यास करणारा विशाल लवकरच भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नियुक्त होणार आहे. देहारादून येथे 18 महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन विशाल देश सेवेत रुजू होणार आहे. त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com