करिअरनामा ऑनलाईन। ही कथा आहे अमेरिकन इंजिनियर जेनिस टोरेसची. जिची 2013 मध्ये (Success Story) नोकरी गेली होती. तेव्हा तिची वार्षिक कमाई 66 लाख रुपये होती म्हणजेच दरमहा 5.5 लाख रुपये. 2013 मध्ये तिला मोठा धक्का बसला आणि टोरेसची नोकरी गेली. आता तीच्यासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा होता. टोरेसने त्याच वेळी ठरवले की आपल्याला काही काम करावे लागेल जेणेकरुन उत्पन्नाचा स्त्रोत कायम राहील. नोकरी जावो वा राहो, पण स्वतःच्या दैनंदिन खर्चाचं टेन्शन राहणार नाही; या हेतूने वाटचाल सुरु होती.
नोकरी गेल्यानंतर अनेकांच्या जीवनावर परिणाम होतो. आता जगायचं कसं? असा प्रश्न त्यांना सतावतो. मात्र, अशावेळी काहीजण निराश होतात, तर काहीजण जगण्यासाठी नवा मार्ग शोधतात. या महिलेनं नोकरी गेल्यानंतर अशाच पद्धतीनं स्वतःच पोट भरण्यासाठी एक नवा मार्ग अवलंबून पाहिला, आणि आज ती महिन्याला लाखो रुपये कमवत आहे.
असा सापडला मार्ग (Success Story)
अवघ्या काही दिवसांमध्येच टोरेस यांना पैसे कमवण्याचा असा काही मार्ग सापडला की, ज्यामुळे त्यांना आता महिन्याला लाखो रुपये मिळतात. कारण नोकरीच्या काळात त्यांनी ‘डेलिश डी लाइट्स’ नावानं एक फूड ब्लॉग सुरू केला होता. पण तेव्हा हा ब्लॉग कमाईचं साधन नव्हे तर एक छंद होता. नोकरी गेल्यानंतर टोरेस यांनी या ब्लॉगकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्या रोज एक पोस्ट ब्लॉगवर अपलोड करत होत्या. यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलं. CNBCच्या ‘Make it Happen’ कार्यक्रमात बोलताना टोरेस म्हणाल्या, “2015 पर्यंत हळूहळू हा फूड ब्लॉग इतका लोकप्रिय झाला की त्याची महिन्याला वाचक संख्या 15,000 पर्यंत पोहोचली. त्यानंतर मी ‘यो क्वेरो डिनेरो’ हे मनी पॉडकास्ट सुरू केलं. या पॉडकास्टद्वारे, मी माझा अनुभव शेअर करते आणि लोकांना पैसे कसे कमवायचे ते शिकवते.”
साईड बिझनेसमधून महिन्याला लाखोंची कमाई
टोरेस यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली, व यासोबतच त्या फ्रीलान्सर म्हणून विविध कामे करत गेल्या. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात भर पडत गेली. टोरेस सांगतात, ‘माझ्या सर्व (Success Story) कामांतून मिळणारं उत्पन्न एकत्र केल्यास ते दरमहा सरासरी 35,000 डॉलर म्हणजेच 28,96,549 रुपये आहे. यामध्ये मुख्य काम वगळता इतर कामांतून मिळणारं उत्पन्न हे 8,27,292 रुपये आहे.’ याचाच अर्थ टोरेस यांना त्यांच्या साईड बिझनेसमधून दर महिन्याला 8 लाखांहून अधिक उत्पन्न मिळतं.
नावडत्या कामावर फोकस करा
टोरेस इतरांना सल्ला देताना सांगतात की, “एखाद्या कारणास्तव तुमची नोकरी गेली, तर तुम्ही साइड बिझनेस करा. आपणास आवडत नसलेल्या कामावर लक्ष केंद्रित करा. एखादं काम आवडत नाही, कारण त्या व्यक्तीला असं वाटतं, की त्याच्याकडे ते काम करण्याची क्षमता नाही. पण तुमच्यातील कमतरतेचा शोध घेऊन तुम्हाला न आवडणाऱ्या कामात पुढे जा.”
पैसे कमवण्याचे दोन मार्ग
टॉरेस यांनी सांगितलं की, “माझ्या ब्लॉगवर जाहिरातींचा ओघ वाढला, व माझी कमाई 100,000 डॉलर पर्यंत पोहोचली. या जाहिराती माझ्या ब्लॉगवर छापलेल्या डिस्प्ले जाहिरातींच्या स्वरूपात होत्या.” टोरेस यांच्या मते, पैसे कमवण्याचे सीपीसी आणि सीपीएम हे दोन मार्ग आहेत. सीपीसी म्हणजे ‘कॉस्ट पर क्लिक’ आणि सीपीएम म्हणजे ‘कॉस्ट पर मिलि आणि थाउजंड.”
त्या पुढे म्हणतात, “तुम्हाला तुमच्या मुख्य कामाशिवाय इतर कामातून मिळणारं उत्पन्न तेव्हाच सुरू होतं, जेव्हा तुम्ही फ्रीलान्स काम करता, किंवा अतिरिक्त पैसे मिळवण्यासाठी (Success Story) काही साइड बिझनेस करता. मी ब्लॉगसोबत विविध 10 कामं करण्यास सुरुवात केली होती. ज्यामध्ये पॉडकास्ट जाहिराती, मार्केटिंग, स्पीकिंग एंगेजमेंट, डिजिटल कोर्स डाउनलोड आणि ब्रँड भागीदारी यांचा समावेश होता.”
नोकरी गेल्यानंतर अनेकजण निराश होतात. पण नोकरी गेल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जात मार्ग शोधल्यास यश मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिकेतील या महिलेचा प्रवास आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com