Success Story : रोजची उपासमार..नवऱ्याचा बेदम मार…अंडरवेअरमध्ये चपात्या लपवून भूक भागवली; अखेर ऑफिसर बनून पतीला धडा शिकवलाच!

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आज सविता प्रधान यांची गणना अत्यंत (Success Story) तडफदार अधिकाऱ्यांमध्ये केली जाते. त्यांची कारकीर्द मध्य प्रदेश सरकारच्या नागरी सेवक पदावरून सुरू झाली. त्या ग्वाल्हेर विभागात सहसंचालक आहेत. अत्यंत गरीब कुटुंबातून अधिकारी होण्याचा त्यांचा प्रवास संघर्षमय आहे. एकेकाळी सासरच्या घरात तिला इतका त्रास व्हायचा की त्या अंडरवेअरमध्ये चपाती लपवायची आणि बाथरुममध्ये जावून खायची. नवरा तिला बेदम मारहाण करायचा. सासू, जाऊ यांची वागणूकही खूप वाईट होती. सासरच्या अत्याचाराला कंटाळून ती आत्महत्या करण्याच्या तयारीत होती. मात्र, त्याच क्षणी असे काही घडले की, या लोकांसाठी मी जीव का द्यायचा, असा विचार तिच्या मनात आला. मग तिने सर्व काही सोडून करिअर करण्याकडे लक्ष वळवले. नागरी सेवेत रुजू होण्याचा उद्देशही केवळ चांगला पगार हा होता. ती पल्या दोन मुलांसह सासरच्या घरातून निघून गेली. यानंतर ती स्वतःसाठी आणि मुलांसाठी काहीही करायला तयार झाली. मधल्या काळात तिने पार्लरमध्ये कामही केले. पुढे अधिकारी होऊन तिने पतीला चांगलाच धडा शिकवला.

Success Story Savita Pradhan

बेधडक अधिकारी (Success Story)
सविता प्रधान या मध्य प्रदेशच्या नावाजलेल्या अधिकारी आहेत. त्या अनेकदा बेधडक कामांमुळे चर्चेत असतात. 2021 मध्ये त्या खांडवा महापालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त झाल्या. मंदसौरच्या सीएमओ असताना त्यांनी अनेक बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांनी येथील माफियांविरुद्ध मोहीम राबवून अफू तस्करांवर कारवाई केली होती. यादरम्यान त्यांच्या आदेशानुसार कोट्यवधींचे बेकायदेशीर बंगले जमीनदोस्त करण्यात आले.

 

 

Success Story Savita Pradhan

हायस्कूल परीक्षा पास होणारी गावातील पहिली मुलगी
अधिकारी होण्याआधीची सविता यांची कहाणी खूप वेदनादायी आहे. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील मंडी नावाच्या गावात एका आदिवासी कुटुंबात झाला. त्यांच्या कुटुंबात खूप गरिबी होती. ती तिच्या आई-वडिलांचे तिसरे आपत्य. गावात 10 वीपर्यंत शाळा होती. बहुतांश मुलींना शाळेत पाठवले जात नसे. पण सविता त्या भाग्यवान (Success Story) मुलींपैकी एक होती ज्यांना शाळेत जाण्याची संधी मिळाली.
ती शाळेत जाण्यामागे पालकांना 150-200 रुपयांची शिष्यवृत्ती मिळायची हाही उद्देश होता. दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेली ती तिच्या गावातील एकमेव मुलगी होती. त्या दिवशी तिचे वडील खूप खुश होते. यानंतर त्यांनी आपल्या मुलीचे नाव 7 किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या सरकारी शाळेत घातले.

 

 

Success Story Savita Pradhan

16व्या वर्षी मनाविरुध्द ठरलं लग्न
11वी आणि 12वी मध्ये जीवशास्त्र विषयाची निवड केली. या दरम्यान तिचा विवाह जुळून आला. योगायोगाने हे नाते फार मोठ्या घरचे होते. सविताच्या वडिलांचा विश्वासच बसत (Success Story) नव्हता की हे नाते त्यांच्या मुलीला कसे आले. मुलाने लग्न ठरताना  सविताला पुढचं शिक्षण मिळवून देणार असल्याचं वचन दिलं. दुसऱ्याच दिवशी तिचा साखरपुडा झाला. सविताची मर्जी यावेळी कुणी विचारात घेतली नाही. त्यावेळी ती अवघी 16-17 वर्षांची होती.

Success Story Savita Pradhan

अंडरवेअरमध्ये चपाती लपवायची
घरच्यांच्या बळजबरीमुळे महिनाभरातच सवीताचे तिच्या मर्जीविरुध्द लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसातच तिला घरात  नोकरांसारखी वागणूक मिळाली. सासरच्या घरी ती काबाडकष्ट करू लागली. तिच्यावर अनेक बंधने होती. तिला डायनिंग टेबलवर सगळ्यांसोबत बसता येत नव्हते. मोकळेपणाने (Success Story) हसता येत नव्हते. तिला घरात सगळ्यांच्या शेवटी जेवायला सांगितले होते. अन्न संपले तर ती पुन्हा शिजवू शकत नव्हती. मारहाण आणि शिवीगाळ होण्याच्या भीतीने ती आपल्या अंडरवेअरमध्ये चपाती लपवायची. मग ती बाथरूम मध्ये जावून मध्येच जेवायची. नवरा तिला सतत मारहाण करायचा. यावेळी तिला कोणाचा पाठिंबा मिळाला नाही.

Success Story Savita Pradhan

सासुरवास सुरुच होता
सासरच्यांचा अत्याचार सहन करत सविता सतत आजारी पडू लागली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा  ती गरोदर असल्याचे समजले. त्यानंतर सविताच्या कुटुंबीयांनी तिला तिच्या माहेरी आणले. सविताने सासरच्या घरी परत जायचे नसल्याचे सांगताच घरच्यांनी पुन्हा पतीसोबतच (Success Story) राहण्याचा हट्ट धरला. सविताला समजले होते की हा मार्ग तिच्यासाठी सोपा नाही. मुलं वगैरे झाल्यावर सगळं ठीक होईल असंही तिला समजावून सांगितलं. एका मुलानंतर तिला  दुसरे अपत्यही झाले. पण परिस्थिती बदलली नाही. नवऱ्याची मारहाण सुरूच होती.

Success Story Savita Pradhan

अभ्यासाला शस्त्र बनवले (Success Story)
सविता अत्याचाराला कंटाळली होती. तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी तिचे एक मूल दीड ते दोन वर्षांचे होते. तर, दुसरा 3-4 महिन्यांचा. ती पंख्याला गळफास लावून घेण्याच्या तयारीत असताना तिला सासू दिसली. योगायोगाने खिडकी उघडी राहिली. पण, सविताला वाचवण्यासाठी तिने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. सर्व काही पाहून सासू पुढे गेली. तेव्हा सविताच्या लक्षात आले की ती अशा लोकांसाठी आपला जीव का देत आहे. मग तिने ठरवलं की आपण काहीही करायचं. पण, त्या घरात रहायचं नाही. सासरचे घर सोडल्यानंतर तिने आपले शिक्षण सुरू ठेवले. यादरम्यान तिने कमाईसाठी काही काल पार्लरमध्ये कामही केले. इंदूर विद्यापीठातून तिने लोक प्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पहिल्याच प्रयत्नात तिने नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.

 

Success Story Savita Pradhan

पतीला शिकवला धडा
सविताची पहिली पोस्टिंग मुख्य पालिका अधिकारी म्हणून झाली होती. तिची करिअरमधील प्रगती पाहून तिचा नवरा पुन्हा तिच्या आयुष्यात आला. यानंतरही त्याने सविताला मारहाण केली. गाडी घेण्यासाठी पैसे घेतले. सुरुवातीला सविताने तिला होत असलेला घरगुती अत्याचार लपविला. पण, एके दिवशी तिने दुःखी मनाने आपल्या वरिष्ठांना याबद्दल सांगितले. वरिष्ठांनी सविताला प्रोत्साहन दिले. यावेळी जर तिचा (Success Story) नवरा तिच्याकडे परत आला तर तिने वरिष्ठांना फोन करावा, असेही सांगितले. एके दिवशी नवरा पुन्हा आला. तो आपल्यावर हल्ला करणार हे सविताला आधीच कळले होते. तिने वरिष्ठांना  कळवताच काही क्षणात पोलिस घरी आले. पोलिसांनी तिच्या नवऱ्याला चांगलीच अद्दल घडवली. पुढे सविताचा पतीपासून घटस्फोट झाला. ती आपल्या दोन मुलांसह आता सुखाने राहू लागली आहे. तसेच एक तडफदार प्रशासकीय अधिकारी म्हणून तिची ओळख कायम आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com