करिअरनामा ऑनलाईन। प्रामाणिकपणे केलेले कष्ट यशाला गवसणी घालण्यासाठी (Success Story) पुरेसे असतात असं म्हंटलं जातं. याचा प्रत्यय आलाय नाशिकमध्ये. संपूर्ण भारतातून 30 उत्तम सैनिकांमधून जे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून विविध परीक्षांचे स्तर पूर्ण करतील अशा 12 सैनिकांची पॅरा कमांडो म्हणून निवड करण्यात येणार होती, त्यामध्ये नाशिकच्या जयदीप जाधवचा सहभाग झाला आहे.
कष्टाचं चीज झालं
नुकतीच देशातील भारतीय सैन्य दलातील पॅरा कमांडोची यादी तयार करण्यात आली आहे. विविध बटालियन मधील फक्त बारा जणांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिकच्या ग्रामीण भागातील एका गवंडयाचा मुलगा मराठा बटालियनच्या माध्यमातून खडतर प्रशिक्षण पूर्ण करून पॅरा कमांडोच्या टीममध्ये सहभागी झाला आहे. पोरानं कष्टाचे चीज केल्याने आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदश्रु आले होते. जयदीप जाधव असं त्याचे नाव असून चांदवड तालुक्यातील वाकी खुर्द या गावचा तो रहिवासी आहेत. या निवडीनंतर गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार करत कौतुक केले आहे.
वडील गवंडी तर आई अंगणवाडी मदतनीस (Success Story)
चांदवड तालुक्यातील वाकी खुर्दचे जयदीप जाधव हे भूमिपुत्र आहेत. भारतीय सैन्यदलातील अतिशय खडतर प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करत पॅरा कमांडो होण्याचा जयदीप यांनी बहुमान पटकावला आहे.
जयदीप जाधवचे वडील हे लासलगाव पंचक्रोशीत गवंडी काम करतात, आई अंगणवाडीमध्ये मदतनीस आहे, घरची परिस्थिती तशी बेताचीच असून त्यावर मात करत जयदीपने हे यश खेचून आणले आहे. त्याने मिळवलेल्या यशामुळे त्यांच्या आई वडिलांचेही सर्वत्र कौतुक होत आहे.
असं होतं प्रशिक्षण
जयदीप जाधव यांची 2021 मध्ये भारतीय सैन्य दलाच्या मराठा बटालियनमध्ये निवड झाली होती. त्यानंतर त्यांनी बेळगाव येथे नऊ महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची सिक्कीम येथे पोस्टिंग झाली होती.
दरम्यानच्या काळातच भारतातून 30 उत्तम फौजदारांमध्ये त्यांना पॅरा कमांडोच्या प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले. तेव्हापासून गेली चार महिने बेळगाव व आग्रा येथे अतिशय (Success Story) खडतर व अवघड समजल्या जाणाऱ्या पॅरा कमांडोचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. प्रत्येक टेस्ट व परीक्षा पार करत सदरचे संपूर्ण प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले. त्यामुळे 30 फौजदारांपैकी अंतिम 12 फौजदारांमध्ये पॅरा कमांडो म्हणून त्यांची निवड झाली.
कुटुंबाला मिळाला सैन्य दलाचा वारसा
त्यांच्या निवडीमुळे वाकी खुर्द, लासलगाव व जिल्ह्यातून कौतुक होत आहे. जयदीप यांचे वडील गंगाधर जाधव गवंडी काम करतात. तर आई कावेरी जाधव अंगणवाडीत (Success Story) मदतनीस आहे. बंधू ऋषिकेश इंडियन आर्मीत सेना पोलिस (CMP) या पदावर कार्यरत आहेत. चुलते युवराज व शिवनाथ जाधव हे देखील भारतीय सैन्य दलात हवालदार पदावर कार्यरत आहेत. सामाजिक कार्यकर्ते किशोर जाधव यांचे जयदीप पुतणे आहेत. जयदीप यांनी त्यांच्या कर्तृत्वाने युवा पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com