Success Story : नोकरी न करता महिन्याला कमावते 1 लाख; फक्त 80 रुपयात केली होती व्यवसायाला सुरुवात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । टेक्स्टाइल इंजिनीअरची पदवी (Success Story) घेतल्यानंतरही या क्षेत्रात करिअर न करता नाज अंजुम यांनी वेगळी वाट शोधली. अंजुम नाज घरबसल्या दर महिन्याला सुमारे एक लाख रुपये कमावतात. एवढी शिकलेली तरुणी नेमकं काय करते. तिची आयडियाची कल्पना सत्यात कशी उतरली याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

टेक्स्टाइल इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर 2010 मध्ये नाज अंजुम यांनी लग्न केले. लग्नानंतर हैदराबादला आल्यानंतर अंजुम यांना त्यांच्यातील स्वयंपाकाचे कौशल्य उलगडले. त्यांनी होम फूड बिझनेस (क्लाउड किचन) सुरू केला आणि आज या माध्यमातून त्या लाखोंची कमाई करत आहेत. त्यांच्या शेजाऱ्यांना, विशेषत: त्याच्या इमारतीतील विद्यार्थ्यांना त्यांचे जेवण खूप आवडायचे.

केवळ 80 रुपयातून केली व्यवसायाला सुरुवात (Success Story)
शिक्षणाने टेक्स्टाइल इंजिनिअर असलेल्या नाज अंजुम यांनी हैदराबादमध्ये होम फूड बिझनेस (क्लाउड किचन) सुरू केला आणि आज त्या लाखोंची कमाई करत आहेत. विशेषत: त्यांच्या शेजाऱ्यांना आणि त्यांच्या इमारतीतील विद्यार्थ्यांना त्यांनी बनवलेले जेवण खूप आवडायचे. या सर्वांनी नाज यांना व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. यानंतर अंजुम यांनी पुढे जायचं ठरवलं. त्यांनी अवघ्या 80 रुपयांपासून या व्यवसायाला सुरुवात केली. पण आता हाच व्यवसाय त्यांना दरमहा सुमारे एक लाख रुपये मिळवून देत आहे.

असं सुरू झालं ‘अंजूम किचन’
सुरुवातीला नाज अंजुम ज्या इमारतीत रहायच्या त्या इमारतीतील विद्यार्थी त्यांच्याकडून संध्याकाळचे मेसचे डबे घ्यायचे. अंजुम यांच्या हाताची चव सर्वांना आवउ लागली आणि हळूहळू त्यांच्या (Success Story) डब्यांची मागणी वाढत गेली. शेजाऱ्यांच्या पाठिंब्याने प्रेरित होऊन त्यांनी 2016 मध्ये घरातूनच ‘अंजूम किचन’ सुरू केले. अवघ्या 80 रुपयांच्या गुंतवणुकीत त्यांनी हा व्यवसाय सुरु केला. बिर्याणी बनवण्याच्या आवडीने त्यांना या व्यवसायात चांगला जम बसवता आला.

मटण दम बिर्याणीची पहिली ऑर्डर
2016 मध्ये रमजान महिन्यात शेजाऱ्यांच्या विनंतीवरून नाझ यांनी ‘डबल का मीठा’ आणि ‘लौकी हलवा’ सारखी मिठाई बनवण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांना HITEC सिटीमध्ये एका छोट्या पार्टीची पहिली ऑर्डर मिळाली. ती ऑर्डर होती मटण दम बिर्याणीची. ही बिर्याणी इतकी लोकप्रिय झाली की लवकरच त्यांना आणखी ऑर्डर येऊ लागल्या.

ऑर्डर्समध्ये झाली वेगाने वाढ (Success Story)
‘अंजूम किचन’ हे कमी काळात हैदराबादमधील पहिल्या महिला क्लाउड किचनपैकी एक बनलं आहे. माऊथ पब्लिसिटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय वाढण्यास मदत झाली. नाझ अंजुम यांनी टिफिन, बिर्याणी, पार्टी ऑर्डर आणि मिठाई या पदार्थांचा त्यांच्या मेनूमध्ये समावेश केला. त्यांच्यातील पाक कलेचे खूप कौतुक होवू लागले. अंजूम यांना लोकांनी सुरुवातीपासूनच प्रोत्साहन दिल्याने त्यांचे मनोबल वाढण्यास मदत झाली.

पगारापेक्षा होते जास्त कमाई
आज ‘अंजूम किचन’ एक यशस्वी क्लाउड किचन म्हणून नावारूपाला आले आहे. त्यांना दररोज 25 ते 50 ऑर्डर मिळतात. या माध्यमातून नाज दर महिन्याला सुमारे 1 लाख रुपये (Success Story) कमावतात. कोरोना लॉकडाऊन काळातही त्यांनी 500 हून अधिक ऑर्डर पूर्ण केल्या. त्या लोकांना घरचे बनवलेले हायजेनिक अन्न देण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करतात. नाझ अंजुम यांचा टेक्स्टाइल इंजिनिअर ते यशस्वी क्लाउड किचनची मालक हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com