Success Story : आई-वडिलांना वाटायचं मुलीनं सरकारी अधिकारी व्हावं; एक टर्निंग पॉईंट आणि उभारला केकचा व्यवसाय

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोरोना लॉकडाऊनच्या काळात (Success Story) घरातून बाहेर जाण्यावर निर्बंध घालण्यात आले होते. त्यावेळी अनेकांनी घरीच राहून वाढदिवस साजरा करण्यास पसंती दिली. लोकांची गरज ओळखून अनेक तरुण मुली आणि महिलांनी स्वतः केक बनवण्यास सुरुवात केली. त्याचवेळी अनेकांनी केक बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले आणि काहींनी ही आवड व्यवसाय म्हणूनही प्रस्थापित केली. मुंबईतील मिताली दातार ही अशीच एक महिला आहे, ज्यांनी लॉकडाऊनच्या काळात केक बनवण्याच्या छंदाला यशस्वी व्यवसायात रूपांतरित केले आहे. त्यांच्या विषयी आपण जाणून घेणार आहोत…

मैत्रिणीच्या घरी जाऊन केक बनवायची (Success Story)
मिताली कॉलेजमध्ये असताना एक दिवसीय केक बनवण्याच्या कार्यशाळेत सहभागी झाली होती. यानंतर, जेव्हा लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा त्यांनी आपल्या मित्रांसाठी केक बनवण्यास सुरुवात केली. मित्रांना तिचे केक इतके आवडले की त्यांनी मितालीकडे ऑर्डर देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात मितालीकडे ओव्हन आणि फ्रीज सारखी उपकरणे नव्हती, त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन केक बनवायची.

घरच्यांचा पाठिंबा आणि व्यवसायाला सुरुवात
मितालीने सरकारी अधिकारी व्हावे अशी तिच्या आईची इच्छा होती; यासाठी मिताली स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. पण तिला यामध्ये वारंवार अपयश येत होते. अशातच एक (Success Story) दिवस असे झाले; 2022 च्या सुरुवातीला कुटुंबाने मितालीला केक व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित केले. घरच्यांच्या पाठिंब्याने मितालीने पूर्ण आत्मविश्वासाने केकचा व्यवसाय सुरू केला आणि हळूहळू ऑर्डर घ्यायला सुरुवात केली.

यशाच्या दिशेने पावले पडू लागली (Success Story)
२५ वर्षीय मितालीच्या केकची चव इतकी प्रसिध्द आहे; की कलाकार आणि मोठ्या कार्यालयांकडून तिला केकच्या ऑर्डर मिळतात. एवढेच नाही तर विलेपार्ले पूर्व येथे तिचा एक स्टॉलही आहे, जिथे तिची बेकरी आणि केक उत्पादने खूप लवकर विकली जातात. ग्राहकांपर्यंत पोहोचता यावे यासाठी तिने हा स्टॉल सुरू केला आणि या स्टॉलमुळे तिच्या ऑर्डर्समध्येही वाढ झाली आहे. मितालीचा प्रवास लहान उद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यातून हे दिसून येते की उत्कटतेने आणि कठोर परिश्रमाने कोणत्याही छंदाचे यशस्वी व्यवसायात रूपांतर केले जाऊ शकते.
केवळ सरकारी अधिकारी होवून करिअर घडवता येत नाही; तर तुमच्यातील कल्पना शक्ती आणि मेहनत तुम्हाला करिअरचा चांगला मार्ग देवू शकते; ही गोष्ट मिताली यांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com