IAS Success Story : अपयश आलं तरी खचल्या नाहीत; संघर्षातून मीरा के बनल्या IAS

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही UPSC उमेदवारांच्या अनेक यशोगाथा वाचल्या असतील आणि ऐकल्याही असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशा संघर्षाची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्यांनी सतत अपयश येऊनही हार मानली नाही आणि UPSC च्या परीक्षेत यश खेचून आणलंच. हि कहाणी आहे IAS मीरा के यांची. मीरा यांनी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून AIR-6 वा क्रमांक मिळवला.

कोण आहेत मीरा के…

मीरा या मूळच्या केरळच्या आहेत. शालेय शिक्षणानंतर त्रिशूरच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी B.Tech. पूर्ण केलं. यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

अपयशाच्या पायरीवरून यशाच्या शिखराकडे…

IAS ची तयारी करताना मीरा यांना सलग तीनवेळा अपयश आलं. सततच्या अपयशाने धीर खचत होता पण जिद्द ठाम होती. या जिद्दीच्या जोरावर मीरा यांनी चौथ्या प्रयत्नात UPSC ची परीक्षा क्रॅक केली. त्या नुसत्या परीक्षा पस झाल्या नाहीत तर संपूर्ण भारतातून त्यांनी AIR-6 वा क्रमांक मिळवला. अभ्यासादरमायन मीरा यांनी अनेक कसोट्या पार केल्या. यातून आलेल्या अनुभवातून भावी अधिकाऱ्यांना परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आणि त्यांची प्रेरणा कायम ठेवण्यासाठी मीरा यांनी कोणत्या टिप्स दिल्या आहेत ते जाणून घेऊया…

मीरा यांनी दिलेल्या टिप्स…

  • UPSC प्रीलिम्स परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करा.
  • चालू घडामोडींवर सतत लक्ष ठेवा.
  • न्यूज पेपर वाचा आणि NCERT पुस्तकांच्या मदतीने तुमचा पाया मजबूत करा.
  • भूगोलाकडे विशेष लक्ष द्या. प्रि
  • लिम्सच्या उजळणीसाठी छोट्या नोट्स बनवा.
  • तुमच्या क्षमतेनुसार रणनीती बनवा आणि योग्य मार्गावर जा.

UPSC ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी त्या म्हणतात; ज्यांना UPSC परीक्षेत यश मिळवायचं आहे त्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही दररोज प्रयत्न केले नाही तर तुम्ही तुमचे ध्येय गाठू शकणार नाही. त्यांच्या मते, यशासाठी कठोर परिश्रम, योग्य नियोजन, जास्तीत जास्त उजळणी, उत्तर लेखनाचा सराव, सकारात्मक दृष्टीकोन या गोष्टी महत्वाच्या आहेत. परीक्षेच्या तयारी दरम्यान ताण येतच असतो. हा ताण दूर करून मूड फ्रेश ठेवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीतून करमणूक करणे गरजेचे आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com