करिअरनामा ऑनलाईन । देशातील अनेक तरुणांचे आयएएस (Success Story) अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून ते अधिकारी होण्यापर्यंतचा सर्वच तरुणांचा प्रवास खडतर असतो. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी ही परीक्षा देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक आहे.
दरवर्षी लाखो उमेदवार या परीक्षेची तयारी करतात, परंतु केवळ काही नशीबवान उमेदवारांनाच या परिक्षेत यश मिळतं; त्यापैकी एक आहे अपराजिता शर्मा. या तरुणीने आपली नोकरी पणाला लावली आणि यूपीएससीची तयारी केली. कोण आहे अपराजिता शर्मा, जिने आपल्या आजोबांचे एकमेव स्वप्न पूर्ण केले; हे आज आपण पाहणार आहोत…
वडील IRS तर आई प्रोफेसर (Success Story)
सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी नोकरी करणाऱ्या अपराजिताला माहीत नव्हते की एक दिवस ती IAS अधिकारी होणार आहे. असं म्हणतात की जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं. असेच काहीसे अपराजिताच्या बाबतीत घडले. बनारसमध्ये वाढलेल्या अपराजिताने विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर, प्रत्येक विद्यार्थ्याप्रमाणे तिने बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, रांची येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. अपराजिताचे वडील सेवानिवृत्त आयआरएस अधिकारी आणि आई प्राध्यापक आहे.
आजोबांचे स्वप्न केले पूर्ण
जेव्हा एखादी व्यक्ती आपले ध्येय गाठण्यासाठी झोकून देते तेव्हा काम करण्यात अधिक मजा येते. अपराजिताच्या बाबतीतही तेच झालं. पहिल्यांदाच अपराजिताच्या (Success Story) आजोबांनी तिला IAS होण्यासाठी प्रोत्साहन दिले. IAS म्हणजे काय याबाबत अपराजिताला अजिबात कल्पना नव्हती. ती मोठी झाल्यावर तिला आयएएसची ओळख पटली. तीच्या नानांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अपराजिताने ठरवले होते की ती आता IAS अधिकारी होणार आहे.
कंपनी सोडून पूर्णवेळ अभ्यास
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अपराजिताला नोकरी लागली होती. एका बड्या कंपनीत ती काम करत होती. नोकरी करत असताना तीच्या डोळ्यात आयएएस होण्याची तळमळ होती आणि ती पूर्ण करण्यासाठी तिने नोकरी सोडली. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करत तिने रात्रंदिवस अभ्यास केला (Success Story) आणि तिला तीच्या मेहनतीचे फळ मिळाले. अपराजिताने 2017 मध्ये UPSC ने घेतलेल्या परीक्षेत संपूर्ण भारतातून 40 वा क्रमांक मिळवून आजोबांचे स्वप्न पूर्ण केले.
अपराजिताचा तरुणांना सल्ला (Success Story)
‘यूपीएससीच्या मुलाखतीत कधीही खोटे बोलू नका’; असा सल्ला IAS अधिकारी अपराजिता शर्मा यांनी दिला आहे. कारण मुळखतीच्या पॅनेलवर बसलेले लोक अतिशय हुशार आणि तज्ज्ञ असतात. तुमची (Success Story) एखादी गोष्ट त्यांना लगेच समजेल. जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल तर तुम्हाला माहित नसलेले अचूक सत्य सांगा. ते तुमचे ज्ञान पाहत नाहीत तर तुमची प्रामाणिकता पाहतात.
अशी करा सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी
अपराजिताने सांगितले की नागरी सेवांची तयारी करताना जास्त सोर्सेसवर अवलंबून राहण्याची गरज नाही. त्याऐवजी मर्यादित सोर्सेसचा आधार घ्या. तसेच वाचलेल्या (Success Story) साहित्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करा, जेणेकरुन प्रत्येक विषयावरील पकड मजबूत करता येईल. नागरी सेवांचा अभ्यासक्रम नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. अभ्यास करताना काय वाचावे आणि काय वाचू नये हे खूप महत्वाचे आहे. अभ्यासाची योग्य रणनिती आखून कठीण वाटणाऱ्या विषयांची तयारी करणं महत्वाचं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com