करिअरनामा ऑनलाईन । युपीएससीची परीक्षा देशातील सर्वात (Success Story) कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी याची मन लावून तयारी करत असतात. काहीजण उत्तीर्ण होतात तर काहींना अपयशाला सामोरं जावं लागतं. बहुतेक वेळा ही मुलं परिस्थिती समोर हार न मानता चिकाटीने प्रयत्न करत राहतात. या विद्यार्थ्यांचा प्रवास अनेकांना प्रेरणा देत असतो. ही परीक्षा उत्तीर्ण करणारे विद्यार्थी देशासाठी कार्य करतात, त्यांच्या या पेशाला अनेकांकडून सन्मान दिला जातो.आजची गोष्ट देखील अशाच एका तरुणाची आहे ज्याने परिस्थिती समोर हार न मानता आपले स्वप्न पूर्ण केले आहे.
वडील नोकरदार तर आई गृहिणी
गगनदीप भारती यांचा जन्म उत्तर प्रदेश मधील नंदनग्रामचा आहे. त्यांचे वडील बांधकाम विभागात काम करायचे तर आई गृहिणी आहे.आपले शिक्षण सेंट जोसेफ अकादमी मधून घेतल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 10वी, 12वीत त्यांनी अव्वल कामगिरी करत 94 टक्के गुण मिळवले आहेत.
गुढग्याला झालेल्या दुखापतीमुळे बदलला निर्णय (Success Story)
शिक्षणाबरोबरच गगनदीप यांना खेळाची आवड आहे. त्यांनी लांब उडी क्रीडा प्रकारात भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविले आहे. यावेळीच घडलेल्या एका घटनेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. जुनीअर ऑलिंपिक्समध्ये भाग घेणं हे त्यांचं स्वप्न होतं, मात्र तो काळ कोव्हीडचा असल्याने ते स्वप्न काही पूर्ण झालं नाही. परिस्थितीवर मात करत त्यांनी सीनियर ऑलिंपिक्समध्ये भाग घेण्याचं निश्चित केलं मात्र नशिबाची साथ नसल्याने सरावाच्या वेळी त्यांच्या गुढग्याला दुखापत झाली व हे स्वप्न देखील पूर्ण होण्याचे सगळेच दरवाजे बंद झाले. परिस्थिती समोर न झुकता जो सकारात्मक विचार करतो त्याच माणसाच्या दारात कधी ना कधीतरी यश येतं. गगनदीप यांनी खचून न जाता नवीन आव्हान स्वीकारलं व संरक्षण सेवेत रुजू होण्याचा विचार केला.
पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC
UPSC सारखी कठीण परीक्षा पास करण्यासाठी लागणारी सगळी मेहनत घेण्याची गगनदीप यांची तयारी होती. यासाठी त्यांनी वेळोवेळी स्वतःच नोट्स तयार केल्या. कोचिंग क्लासचा (Success Story) आधार घेत त्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला. अथक परिश्रमातून त्यांनी UPSC च्यावतीने घेण्यात आलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) परीक्षेत 85वा क्रमांक पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करणाऱ्या गगनदीप यांचं वय केवळ 23 वर्ष आहे. आता ते असिस्टंट कमाडेंट बनले आहेत व सध्या Combined Defence Services (CDS) परीक्षेच्या निकालाचीही वाट पाहत आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com