Success Story : पास झाली तरी समाधानी नव्हती; पुन्हा परीक्षा दिली; आठवड्यात 2 दिवस अभ्यास अन् या तरुणीने अशी क्रॅक केली UPSC 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होणे (Success Story) म्हणजे लोखंड चघळण्यासारखे आहे असं अनेकजण म्हणतात. पण अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने ही म्हण चुकीची सिद्ध केली आहे. हरियाणाची रहिवासी असलेल्या देवयानी सिंहची कथाही अशीच आहे. या तरुणीने आठवड्यातून केवळ 2 दिवस अभ्यास करुन UPSC सारखी अवघड परीक्षा उत्तीर्ण करुन तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाची खडतर परीक्षा उत्तीर्ण होणे हे अनेक तरुणांचे स्वप्न असते. पण दरवर्षी काहींनाच यामध्ये यश मिळते. प्रत्येक उमेदवार आपापली रणनिती आखून अभ्यास करत असतो. काही विद्यार्थी या परीक्षेच्या तयारीसाठी मेहनत घेतात आणि दररोज तासनतास अभ्यास करतात. तर काही विद्यार्थी ठराविक वेळेतच अभ्यास करतात आणि इतर वेळेत आपले छंद जोपासतात.

आठवड्यातून फक्त 2 दिवसच अभ्यास
हरियाणाची रहिवासी असलेल्या देवयानी सिंह यांनी आठवड्यातून फक्त 2 दिवस अभ्यास केला. या अभ्यासाच्या जोरावर त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या या कर्तबगारीमुळे चहुबाजूने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
चंदीगडमध्ये घेतलं शिक्षण (Success Story)
देवयानी यांनी चंदीगडच्या शाळेतून 10वी आणि 12वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांनी 2014 मध्ये बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पिलानीच्या गोवा कॅम्पसमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली.

परीक्षेचा प्रवास सोपा नव्हता
UPSC परीक्षा देणं त्यांच्यासाठी फार सोपं नव्हतं. देवयानी सिंह यांना (Success Story) अनेक अडचणींचा सामना करावा लागला. 2015, 2016 आणि 2017 मध्ये त्यांना सलग तीनवेळा अपयश आले. पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात देवयानी पूर्व परीक्षा उत्तीर्णही होऊ शकल्या नाही, पण तिसर्‍या प्रयत्नात त्या मुलाखत फेरीपर्यंत पोहोचल्या पण त्यांचे नाव अंतिम यादीत आले नव्हते. यामुळे त्या निराश झाल्या होत्या. पण त्यांनी हार मानली नाही.

अखेर जे हवं ते मिळालंच
असे असूनही देवयानीने हार मानली नाही आणि 2018 मध्ये त्यांनी परीक्षेचा चौथा प्रयत्न केला. यानंतर तिने UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि संपूर्ण भारतात 222 वा क्रमांक मिळवला. देवयानी यांना त्यांच्या पदानुसार केंद्रीय लेखापरीक्षण विभागात नियुक्त करण्यात आले. नियुक्ती झाल्यानंतर (Success Story) त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले. देवयानी त्यांना मिळालेल्या रँकवर समाधानी नव्हत्या म्हणून तिने पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रशिक्षण सुरु असल्यामुळे त्यांना  परीक्षेच्या तयारीसाठी फारसा वेळ देता आला नाही. या परिस्थितीत त्या फक्त शनिवार-रविवारी हे दोनच दिवस अभ्यास करत असत. एकदा अभ्यासाला बसलं की आपण किती वेळ अभ्यास करतोय याचे भान त्यांना नसायचे. प्रशिक्षण घेत असताना अभ्यासही सुरु होता. आठवड्यातून केवळ दोनच दिवस केलेल्या तयारीचा परिणाम म्हणून, देवयानी यांना 2019 मध्ये परिक्षेत अपेक्षित यश मिळाले आणि त्यांनी संपूर्ण भारतातून 11 वा क्रमांक मिळवत IRS पद पदरात पाडले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com