Success Story : हा आहे खरा बिझनेसमन!! गाईच्या शेणापासून कोटींची कमाई; इंजिनिअरिंग सोडून असा बनला उद्योगपती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । नोकरी करणारा माणूस व्यवसाय (Success Story) करू शकत नाही; असं नाही. व्यवसाय करण्याची इच्छा आणि आवड असेल तर कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. एखादा छोटासा व्यवसाय करुनही मेहनतीच्या जोरावर मोठं साम्राज्य उभारता येतं. अनेक सुशिक्षित तरुण आता नोकरीच्या मागे न धावता व्यवसायात नशीब आजमावत आहेत. एका तरुणाची अशीच प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. ज्याने नोकरी सोडल्यानंतर आपल्या मनाचं ऐकलं आणि आज तो एक मोठा व्यापारी बनला आहे.
नोकरीत मन रमत नव्हतं (Success Story)
26 वर्षीय तरुण जयगुरु आचार हिंडर हा एका खासगी कंपनीत सिव्हिल इंजिनियर होता. मात्र नंतर त्याने शेण आणि दुधाचा व्यवसाय सुरू केला. तरुणाने नोकरी सोडून या कामात स्वत:ला झोकून दिले. आज तो या व्यवसायातून भरपूर नफा कमावत आहे. जयगुरु आचार हिंडर हा दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील मुंडुरू गावचा रहिवासी आहे. त्याने विवेकानंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड (Success Story) टेक्नोलॉजी, पुत्तूर येथून इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 22,000 रुपये पगारावर खासगी कंपनीत कामाला सुरुवात केली. पण या कामात त्याचे मन रमत नव्हते. रोजच्या कामाचा त्याला कंटाळा येऊ लागला. नोकरीत रस नसल्याने त्याने 2019 मध्ये नोकरी सोडली.

असा सुरु झाला व्यवसाय
या तरुणाला शेतीची आवड होती. त्याने वडिलांसोबत शेतीची कामे करण्यास सुरुवात केली. त्याच्या घरी 10 गायी होत्या, ज्यांच्यासोबत तो वेळ घालवत असे. त्याने उत्पन्न वाढवण्याचे (Success Story) अनेक मार्ग शोधले. इंटरनेटवर अनेक व्हिडीओ पाहून हिंडरने पटियालाला जाण्याचा निर्णय घेतला. शेतीसोबतच दुग्धव्यवसाय सुरू केला आणि हळूहळू त्यांच्या डेअरीत 130 गायी वाढवल्या. त्यानंतर काही काळानंतर त्याने डेअरी वाढवण्यासाठी 10 एकर जमीनही विकत घेतली.

लाखोंमध्ये होतो नफा
यानंतर त्याच्या मनात एक कल्पना आली आणि त्याने एक मशीन विकत घेतली. हे यंत्र गायीचे शेण सुकवते. हिंडर आता दर महिन्याला 100 पोती शेण विकतो आणि त्यातून भरपूर (Success Story) कमाई करतो. यामध्ये गायींचे शेण, गोमूत्र आणि गायींना आंघोळ घातल्यावर मिळणारे सांडपाणी यांचा समावेश आहे. हिंडर दररोज 750 लीटर दूध आणि दरमहा 30-40 लीटर तूप विकतो. 10 एकरात पसरलेल्या त्याच्या फार्महाऊसमध्ये तो हा व्यवसाय करतो. यातून तो दरमहा 10 लाख रुपये कमावतो. आणि आता तो दुग्धजन्य पदार्थ बनवण्यासाठी युनिट स्थापन करण्याच्या तयारीत आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com