Success Story : दोन वेळच्या खाण्याची चिंता; प्रसंगी टॉयलेटमध्ये राहिले; तरीही ‘असे’ बनले 600 कोटींचे मालक

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जीवन जगत असताना माणसाच्या (Success Story) आयुष्यात अनेक चढ उतार येत असतात. काहीजण नैराश्यात जातात आणि एकाकी पडतात तर काहीजण राखेतून उठून फिनिक्स पक्षाप्रमाणे गगन भरारी घेतात. आज आपण अशाच एका उद्योगपतीची यशोगाथा पाहणार आहोत. जे कधीकाळी इतक्या गरिबीत जीवन जगत होते की तुम्ही विचारच करु शकणार नाही. या कठीण परिस्थितीत त्यांच्या बायकोने देखील त्यांची साथ सोडली होती. अशावेळी त्यांनी आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत चक्क टॉयलेटमध्ये राहून जीवन व्यतीत केले. तरीही ते खचले नाहीत. त्यांना यशस्वी होण्याच्या ध्येयाने पछाडले होते; त्यामुळेच ते आज तब्बल 600 कोटींचे मालक होवू शकले आहेत. कोण आहे ही व्यक्ती; जाणून घेवूया…

ख्रिस्तोफर गार्डनर
आयुष्यात आलेल्या संकटांना धैर्याने तोंड दिल्यास, यश नक्कीच आपल्या गळ्यात माळ घालते; हे सिद्ध करून दाखवले आहे उद्योगपती ख्रिस्तोफर गार्डनर (Christopher Gardner) यांनी. एकेकाळी ज्यांना दोन वेळचे खायला मिळत नव्हते ते आज 600 कोटी रुपयांचे मालक झाले आहेत.

प्रसंगी धुणी-भांडीही केली
ख्रिस्तोफर गार्डनर यांचा जन्म फेब्रुवारी 1954 मध्ये अमेरिकेत झाला. त्यांचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. त्यानंतर आयुष्याच्या मध्यावधीमध्ये संकटांनी त्यांना घेरले. त्यांच्या आईला खोट्या आरोपात तुरुंगात जावे लागले. बहीण पालन-पोषणगृहात होती. त्यांनी काही काळ धुणी-भांडी करत उदरनिर्वाह करून (Success Story) थोडेफार पैसे जमवून हायस्कूलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी लग्न केले. त्यानंतर देखील संकटे त्यांची पाठ सोडत नव्हती. लग्नानंतर काही वर्षातच बायकोने देखील त्यांची साथ सोडली. ज्यामुळे ते आपल्या पाच वर्षाच्या मुलासोबत राहू लागले; त्याचे पालन पोषण करु लागले.

आयुष्याला अशी मिळाली कलाटणी
मुलाचे पालनपोषण करण्यासाठी त्यांनी काही काळ नोकरी देखील केली. पण यामधून त्यांच्या स्वतःच्या आणि मुलाच्या गरजा पूर्ण होत नव्हत्या. तब्बल 4 वर्षांनी त्यांनी नोकरी सोडली आणि (Success Story) उत्पन्न वाढवण्यासाठी सेल्समन म्हणून वैद्यकीय उपकरणे विकण्यास सुरुवात केली आणि इथूनच ख्रिस्तोफर गार्डनर यांच्या आयुष्याच्या कलाटणी मिळाली. एकदा त्यांना वैद्यकीय उपकरणे एका क्लायंटला दाखवायचे होते. बॉब ब्रिजेस असं या व्यक्तिचं नाव; तो स्टॉक ब्रोकर होता जो महिन्याला लाखोंची कमाई करत होता. ज्याच्याशी बोलणे झाल्यानंतर ख्रिस्तोफरने देखील स्टॉक ब्रोकर होण्याचा निश्चय केला.

ब्रोकरेज फर्ममध्ये नोकरी
ख्रिस्तोफर यांनी मध्यंतरीच्या काळात खूप मेहनत घेतली आणि आज ते अमेरिकन स्टॉक ब्रोकरेज फर्म ‘डीन विटर रेनॉल्ड्स’चे उच्च कर्मचारी झाले आहेत. दररोज 200 ग्राहकांशी बोलण्याचे त्यांचे ध्येय असायचे. 1982 मध्ये जेव्हा ख्रिस्तोफर यांनी त्यांच्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या तेव्हा ते बेअर स्टर्न्स अँड कंपनीमध्ये फूट टाइम कर्मचारी बनले. या काळात त्यांनी मोठा अनुभव गाठी बांधला. याच अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःचे फर्म उभारण्याचा निर्णय घेतला.

600 कोटींचे मालक आहेत ख्रिस्तोफर (Success Story)
ख्रिस्तोफर यांनी 1987 मध्ये ‘गार्डनर रिच अँड कंपनी’ नावाची फर्म स्थापन केली. 2006 मध्ये त्यांनी या कंपनीतील एक छोटासा हिस्सा विकला आणि ती एक कोटी डॉलरची कंपनी बनली. आज ख्रिस्तोफर हे जवळपास 600 कोटी रुपयांचे मालक आहेत. 2006 मध्ये ख्रिस्तोफर यांच्या संघर्षावर एक हॉलिवूड चित्रपट आला आहे. ‘द पर्स्युट ऑफ हॅप्पीनेस’ या चित्रपटात विल स्मिथने ख्रिस्तोफर गार्डनरची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पाहायला मिळेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com