Success Story : पोरी जिंकलस!! वडिलांच्या छोट्या लॅबला 9 हजार कोटींची कंपनी बनवणारी अमीरा शाह कोण आहे?

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय महिला उद्योजिका (Success Story) अमीरा शाह ‘मेट्रोपोलीस हेल्थकेअर लिमिटेड’ या प्रसिद्ध पॅथॉलॉजी लॅब चेनच्या प्रमुख आहेत. अमीरा यांचे वडील डॉ. सुशील शाह यांनी ‘मेट्रोपोलिस’ या पहिल्या भारतीय आंतरराष्ट्रीय पॅथॉलॉजी लॅबची पायाभरणी केली पण अमीरा यांनी आपल्या मेहनतीने या व्यवसायात घवघवीत यश मिळवले आहे. एका छोट्या लॅबमधून सुरू झालेल्या मेट्रोपोलीसचा अमीरा यांनी 7 देशांमध्ये विस्तार केला जिथे 171 लॅब कार्यरत आहेत. अमीरा यांचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. आज आपण या यशस्वी उद्योजिकेबद्दल जाणून घेणार आहोत.

वयाच्या 22 व्या वर्षी हाती घेतला व्यवसाय
जागतिक दर्जाची पॅथॉलॉजी लॅब म्हणून ओळखल्या जाणारी मेट्रोपोलिस हेल्थकेअरच्या आज जगभरात अनेक शाखा आहेत आणि कंपनीच्या या यशामागे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक अमीरा शाह (Ameera Shah) यांचे मोठे योगदान आहे. अमीरा यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षीच उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आणि बघताच बघता 9938 कोटींची हेल्थकेअर कंपनी उभी केली आहे.

कोण आहेत अमीरा शाह?
अमीरा यांनी मुंबईच्या प्रसिद्ध इचार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून वाणिज्य शाखेत पदवी प्राप्त केली. त्यानंतर अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठातून फायनान्सची पदवी घेतली. अमीरा हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या (OPM प्रोग्राम) माजी विद्यार्थी देखील आहेत तर न्यूयॉर्कमधील गोल्डमन सॅक्समधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली.

अमेरिकेची नोकरी सोडून मायदेशी परतली (Success Story)
बांगलादेश ग्रामीण बँकेचे संस्थापक आणि नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांच्या व्यक्तिमत्वाचा अमिरा यांच्यावर प्रभाव आहे. म्हणूनच अमिरा या 2001 मध्ये अमेरिकेतून मायदेशात परत आल्या. इथे आल्यानंतर त्यांनी वडिलांचा प्रयोगशाळा व्यवसाय पुढे नेण्याचा निर्धार केला. भारतातील वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी अमीरा यांनी नोकरीचा राजीनामा दिला. 2001 मध्ये वयाच्या केवळ २२ व्या वर्षी त्यांनी वडिलांच्या व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी हाती घेतली. अमीरा यांनी अथक परिश्रमाने व्यवसाय सांभाळला आणि छोटी लॅब म्हणून सुरू झालेल्या कंपनीचे 9938 कोटींच्या मार्केट कॅप असलेल्या कंपनीत रूपांतर केले.

सर्वात शक्तिशाली महिलांमध्ये मिळवले स्थान (Success Story)
देश-विदेशातील विविध व्यावसायिक व्यसपीठांवर अमीरा एक वक्ता म्हणून समोर आल्या आहेत. २०१७,२०१८ आणि २०१९ मध्ये फॉर्च्यून इंडियाने उद्योग जगतातील 50 सर्वात श्रीमंत (Success Story) महिलांपैकी एक म्हणून अमिरा यांची निवड केली. सध्या अमीरा टोरेंट फार्मासह विविध भारतीय कंपन्यांच्या संचालक मंडळावर स्वतंत्र संचालक देखील आहेत. अमिरा यांनी २०१७ मध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील व्यवसायांना मार्गदर्शन, सल्ला आणि सूक्ष्म-निधीसाठी ‘Empowerrace’ या बिगर-नफा व्यासपीठाची स्थापना केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com