Success Story : भेटा सर्वात कमी वयात कलेक्टर बनलेल्या तरुण IAS ऑफिसर्सना

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। भेटा देशातल्या या सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांना (Success Story) आणि जाणून घ्या त्यांची यशोगाथा. देशातली प्रतिष्ठीत UPSC ची परीक्षा देऊन आयएएस बनणं हे अनेकांचं स्वप्न असतं. ही परीक्षा उत्तीर्ण होणं हे खूपच अवघड असतं पण काही तरुणांनी अगदी कमी वयात ही परीक्षा उत्तीर्ण केली. आणि ते देशातले सर्वात तरुण आयएएस अधिकारी झाले.

या यादीत पहिलं नाव आहे, 2015 साली आयएएस झालेल्या अन्सार अहम्मद शेखचं (Ansar Shaikh). अन्सारचे वडील रिक्षाचालक आहेत. अन्सार सांगतात, ‘माझे वडील दिवसाला 100 ते 150 रुपये कमवायचे. अनेक वेळेला परिस्थितीमुळे रात्रीचं जेवणही करता यायचं नाही. पण आता मात्र मी आयएएस अधिकारी होऊन (Success Story) माझ्या वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं आहे.’ अन्सार शेख हे सध्या IAS अधिकारी पदाची धुरा जबाबदारीने पार पडत आहेत.

 

Success Story

या यादीत दुसरं नाव आहे रोमन सैनीचं (Roman Saini). रोमन यांनी वयाच्या 22 व्या वर्षी ही परीक्षा उत्तीर्ण केली होती. ते देशात 18 वे आले. यूपीएससीचं कोचिंग घ्यायचं असेल तर बराच खर्च होतो. त्यामुळे प्रत्येक (Success Story) जण हा खर्च करू शकत नाही. म्हणूनच ऑनलाइन ट्रेनिंगच्या माध्यमातून हुशार विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ट्रेनिंग देण्याचा निर्णय रोमन सैनी यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी 2015 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.

Success Story

तरुण आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत तिसरं नाव आहे राजस्थानच्या स्वाती मीना नाइक हिचं. मीणा यांनी 22 व्या वर्षीच आयएएस परीक्षा उत्तीर्ण केली. 2007 साली ही परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या स्वाती यांचा देशात 260 वा क्रमांक होता. सध्या त्या मध्य प्रदेश राज्य सहकारी विपणन सेवेत कार्यरत आहेत.

 

Success Story

अमृतेश औरंगाबादकर (Amrutesh Aurangabadkar) यांचाही या तरुण आयएएस अधिकाऱ्यांमध्ये समावेश आहे. अमृतेश यांनी 2011 मध्ये यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी देशात 10 वा क्रमांक मिळवला होता. पुण्याचे (Success Story) अमृतेश औरंगाबादकर 2012 च्या गुजरात केडरचे अधिकारी आहेत. सध्या वडोदराचे प्रादेशिक आयुक्त आहेत.

Success Story

अंकुर गर्ग हेही देशातले तरुण आयएएस अधिकारी. अंकुर गर्ग यांनी 2002 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यावर्षी उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ते सर्वात तरुण (Success Story) अधिकारी होते. अंकुर गर्ग हे आआयटी दिल्लीचे पदवीधर आहेत. सध्या ते हॉवर्ड विद्यापीठाचं पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

Success Story

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com