Success Story : ऐकू येत नव्हतं पण ध्येय ठरलं होतं; नाशिकचा आशिष NEETमध्ये देशात ठरला अव्वल; असा केला अभ्यास

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । वैद्यकीय शाखेच्या प्रवेशासाठी घेतल्या (Success Story) जाणाऱ्या राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या NEET परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या परीक्षेत नाशिकचा आशिष भराडीया हा विद्यार्थी दिव्यांगामध्ये देशात प्रथम आला आहे. तर जनरल कॅटेगिरीमध्ये देशात त्याचा 722 वा रँक आला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे नाशिकसह जिल्हाभरात त्याचे कौतुक होत आहे.
नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 लाख विद्यार्थी बसले होते. देशातील 499 शहरांमध्ये व परदेशातील 14 शहरांमध्ये ही परिक्षा पार पडली. एकूण 13 भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा (Success Story)
मे महिन्यात घेण्यात आलेल्या नीट परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला असून या परीक्षेत आशिष भराडीया हा विद्यार्थी अपंगांमध्ये देशात प्रथम आला. आशिष हा नाशिक येथील सुप्रसिध्द बालरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद भराडीया आणि डॉ. वैशाली भराडीया यांचा मुलगा आहे.

दिव्यांगावर केली मात
नीट परीक्षेला यावर्षी देशभरातून 21 लाख विद्यार्थी बसले होते. देशातील 499 शहरांमध्ये व परदेशातील 14 शहरांमध्ये ही परिक्षा घेण्यात आली. यासाठी आशिष देखील दिव्यांग कॅटेगीरीतुन परीक्षेला बसलेला होता. तो या परीक्षेसाठी प्रचंड मेहनत घेत होता. जिद्दीच्या जोरावर त्याने हे दैदिप्यमान (Success Story) यश मिळवले आहे. आशिष भराडीया लहान असल्यापासून त्याला ऐकण्यास येत नव्हते; त्यामुळे त्याच्या कानावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर त्याने आपल्या अभ्यासात सातत्य ठेवत, दिव्यांगावर मात करत देशात पहिला येण्याचा मान मिळवला आहे.

दोघा भावांची परिक्षेत आघाडी
आशिषचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या फ्रावशी इंटरनॅशनल स्कुलमध्ये झाले आहे. बारावीच्या परीक्षेत त्याला 85 टक्के गुण मिळाले आहेत. तर नीट परीक्षेत (Success Story) त्याला 720 पैकी 690 गुण मिळाले आहेत. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. विशेष म्हणजे आशिषचा भाऊ विश्वेश भराडीया यानेही यापूर्वी अशाच प्रवेश परीक्षेत मोठं यश मिळवत देशात 51 वा क्रमांक पटकावला होता. सध्या तो दिल्लीतील एम्सममध्ये कार्यरत आहेत.

दररोज आठ तास अभ्यास (Success Story)
दरवर्षी देशभरातून NEET परीक्षेला लाखो विद्यार्थी बसतात. त्यासाठी प्रचंड मेहनत देखील विद्यार्थ्यांकडून घेतली जाते. आशिषने देखील नीट परिक्षेच्या तयारीसाठी प्रचंड मेहनत घेतली. आशिषने खासगी क्लासही लावला होता. तो दररोज किमान आठ तास अभ्यास करत असायचा. अभ्यासातील सातत्यामुळे त्याला हे यश मिळाल्याचे तो सांगतो.
देशभरातून 2038596 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यातील 1145976 विद्यार्थी हे पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरले आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे सर्वाधिक 1,39,961 विद्यार्थी परीक्षेच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com