SSC Recruitment 2024 : कर्मचारी निवड आयोगाची 2049 पदांवर मेगाभरती जाहीर!! जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल (SSC Recruitment 2024) तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. कर्मचारी निवड आयोगाने मेगाभरती जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून विविध सरकारी पदांच्या तब्बल 2049 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे ही भरती तरुणांसाठी महत्वाची ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करुन या संधीचा फायदा करुन घ्यायचा आहे.

SSC अंतर्गत वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ. पदे भरली जाणार आहेत. एकूण 2049 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

आयोग – कर्मचारी निवड आयोग
भरली जाणारी पदे – वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, ग्रंथालय आणि माहिती सहाय्यक, हिंदी टंकलेखक, प्रयोगशाळा परिचर, उप रेंजर, ग्रंथपाल, तंत्रज्ञ, कॅन्टीन अटेंडंट, स्टोअर लिपिक, कनिष्ठ अनुवादक, ड्राफ्ट्समन,विभाग ग्रेड दोन, तीन, लोअर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, लिपिक कॅन्टीन, स्टोअर कीपर, कनिष्ठ लेखापाल, फायरमन, मल्टी टास्किंग स्टाफ मिनिस्ट्रियल, फार्मासिस्ट, स्टेनोग्राफर, कन्फेक्शनर कम कुक, सिव्हिल मोटर ड्रायव्हर सामान्य ग्रेड, ड्रायव्हर, नर्सिंग ऑफिसर, सब एडिटर इ.
पद संख्या – 2049 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 मार्च 2024

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे
अर्ज फी – Rs. 100/
आवश्यक कागदपत्रे –
1. आधार कार्ड/ई-आधारची प्रिंटआउट
2. मतदार ओळखपत्र
3. चालक परवाना
4. पॅन कार्ड
5. पासपोर्ट
6. शाळा/कॉलेजद्वारे जारी केलेले ओळखपत्र
7. नियोक्ता ओळखपत्र (सरकारी/ PSU/ खाजगी), इ.
8. संरक्षण मंत्रालयाने जारी केलेले माजी सैनिक डिस्चार्ज बुक.
9. केंद्र/राज्य सरकारने जारी केलेले वैध ओळखपत्र असलेले इतर कोणतेही फोटो

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज करायचा आहे.
3. मुदती नंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
4. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
5. अपुर्ण कागदपत्रे/ माहिती सादर केल्यास उमेदवारास अपात्र केले जाईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मार्च 2024 आहे.

काही महत्वाच्या तारखा –

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com