SSC Recruitment 2023 : स्टाफ सिलेक्शनच्या पद संख्येत मोठी वाढ!! जाणून घ्या किती जागा वाढल्या

करिअरनामा ऑनलाईन । स्टाफ सिलेक्शन कमिशनने उमेदवारांना मोठी (SSC Recruitment 2023) आनंदाची बातमी दिली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने CGL परीक्षा 2022 द्वारे भरल्या जाणार्‍या पदांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. सीजीएल भरती 2023 द्वारे आता एकूण 37 हजार 409 पदे भरली जाणार आहेत. याआधीच्या भरतीद्वारे 20 हजार पदे भरण्यात आली होती.

आयोगाने जाहीर केलेल्या नवीन रिक्त पदांच्या विभाजनामध्ये 17 हजार अधिक पदांची भर घालून एकूण 37 हजार 409 पदे भरण्याची घोषणा करण्यात आली आहे. यातील (SSC Recruitment 2023) बहुतांश पदे टपाल खात्याची आहेत. यामुळे पोस्ट विभागामध्ये पोस्टिंग असिस्टंट आणि सॉर्टिंग असिस्टंटच्या 19 हजार 676 जागा भरल्या जातील.

विशेष म्हणजे, एसएससी सीजीएल टियर 1 परीक्षा (SSC Recruitment 2023) आयोगाने 1 ते 13  डिसेंबर दरम्यान आयोजित केली होती. यानंतर आता टियर 2 ची परीक्षा 27 मार्चपर्यंत चालणार आहे. त्याच वेळी, टियर 1 परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा उमेदवारांना अजूनही कायम आहे.

SSC CGL पदभरतीचा नवीन तपशील पाहण्यासाठी येथे CLICK करा – PDF

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com