SSC HSC Exam : 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार परीक्षा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी (SSC HSC Exam) एक मोठी अपडेट आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ फेब्रुवारी आणि मार्चमध्ये इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षा घेणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इयत्ता बारावीची  परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 मार्चपर्यंत चालणार आहे.

महाराष्ट्र बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, बारावीची म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च या कालावधीत होणार आहे. तर 12वीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 मार्चपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र बोर्डाची दहावी आणि बारावीची परीक्षा सकाळी 11 ते 2 आणि दुपारी 3 ते 6 या वेळेत होणार आहे.

हॉल तिकिटविषयी….
मीडिया रिपोर्ट्सनुसार, महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12वी आणि 10वीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. मात्र, यासंदर्भात (SSC HSC Exam) सध्या कोणतीही अधिकृत माहिती हाती आली नाही. प्रवेशपत्र असल्याशिवाय तुम्हाला परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

1. सर्वप्रथम महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
2. त्यानंतर 10वी आणि 12वी वेळापत्रक 2024 च्या लिंकवर क्लिक करा.
3. आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल.
4. विद्यार्थी ही PDF चेक करू शकतात आणि डाउनलोड करू शकतात.

उत्तीर्ण होण्यासाठी इतके गुण आवश्यक (SSC HSC Exam)
महाराष्ट्र बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात किमान 35 टक्के गुण मिळवणे बंधनकारक असेल. यापेक्षा कमी गुण मिळाल्यास त्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी मिळेल. परीक्षेविषयी वेळोवेळी माहिती मिळवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देत रहा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com