SSC HSC Exam : 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारचा दिलासा!! पेपरसाठी ‘इतका’ वेळ मिळणार वाढवून

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारी (SSC HSC Exam) बातमी समोर आली आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी-बारावी बोर्डाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.

राज्यात मधल्या दोन वर्षांच्या काळात कोरोना लॉकडाऊनमुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षा केंद्रावर न जाता ऑनलाईन परीक्षा द्यावी लागली होती. विशेष म्हणजे सर्वच इयत्तेच्या विद्यार्थ्यांची परीक्षा मधल्या दोन वर्षाच्या काळात ऑनलाईनच झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा लिहिण्याचा (SSC HSC Exam) सराव कमी झाल्याचं पालकांचं मत आहे. पालकांच्या याच मताचा विचार करुन दहावी-बारावी परीक्षा बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हिताचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता पेपर लिहिण्यासाठी दहा मिनिटांचा वेळ वाढवून मिळणार आहे. बोर्डाने नुकतंच 10 मिनिटं आधी प्रश्नपत्रिका देण्याची पद्धत (SSC HSC Exam) बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र विद्यार्थ्यांना आता पेपर लिहिण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटं जास्त वेळ मिळणार आहे.

विशेष म्हणजे बोर्डाने याबाबत परिपत्रक काढत माहिती जारी केली आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरु होण्यास अवघे काही दिवस बाकी आहेत. या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर बोर्डाकडून काही महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

परीक्षा केंद्राजवळील झेरॉक्स दुकाने राहणार बंद (SSC HSC Exam)

दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्या यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली तयार केली आहे. येणाऱ्या शालांत परीक्षा ह्या कॉपीमुक्त करण्यासाठी निवडणूक प्रक्रियेप्रमाणे तहसीलदार, स्थानिक पोलीस स्टेशनचे प्रभारी आणि इतर कर्मचारी यांची फिरती पथके तैनात करण्यात येणार आहेत.

तालुका स्तरावरील अधिकारी या सर्व परीक्षा केंद्रांवर जाऊन या सगळ्याचा आढावा घेणार आहेत. तसेच कॉपीमुक्त परीक्षा होण्यासाठी नियमांचं काटेकोर पालन (SSC HSC Exam) केलं जाईल. या परीक्षा केंद्रांवर मोबाईल आणि स्मार्ट वॉच घेऊन जाण्याची प्रतिबंध लावण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे

दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये मास कॉपी झाल्यास केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. या परिक्षेत तालुका (SSC HSC Exam) स्तरावर संपूर्ण यंत्रणेवर तहसीलदारांचे नियंत्रण असेल. जिल्हा स्तरावरून स्वतः जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात भरारी पथक तैनात असतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com