करिअरनामा ऑनलाईन। विविध केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये GD कॉन्स्टेबल पदांच्या (SSC GD Constable Exam) भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. एसएससीद्वारे आयोजित जीडी कॉन्स्टेबल भरती ही तरुणांमधील सर्वात लोकप्रिय भरती आहे. ज्यासाठी दरवर्षी लाखो उमेदवार तयारी करत असतात. याद्वारे विविध केंद्रीय सुरक्षा दलांमध्ये जीडी कॉन्स्टेबलची पदे भरली जातात.
या वर्षीही या पदांच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया 27 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे.
उमेदवार ssc.nic.in येथे SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन GD कॉन्स्टेबल भरतीसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांची निवड संगणक आधारित परीक्षा, पीईटी, पीएसटी आणि वैद्यकीय चाचणीद्वारे केली जाईल.
असं आहे परीक्षेचं पॅटर्न (SSC GD Constable Exam)
- SSC GD कॉन्स्टेबल परीक्षा 2022 मध्ये एकूण 80 प्रश्न विचारले जातील. जे एकूण 160 गुणांचे असतील.
- प्रत्येक प्रश्नासाठी 2 गुण दिले जातील.
- परीक्षा सोडवण्यासाठी उमेदवारांना 60 मिनिटे दिली जातील.
- परीक्षा संगणकावर आधारित म्हणजेच CBT मोडमध्ये असेल.
- यामध्ये जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, जनरल नॉलेज अँड जनरल अवेअरनेस, एलिमेंटरी मॅथेमॅटिक्स आणि इंग्रजी/हिंदीमधून 20 प्रश्न विचारले जातील. (SSC GD Constable Exam)
- प्रत्येक विषयाला जास्तीत जास्त 40 गुणांचे प्रश्न असतील.
- सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
- परीक्षा फक्त इंग्रजी आणि हिंदी भाषेत असेल. तसेच, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.50 गुणांचे नकारात्मक गुण असतील.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com