SSC Exam 2023 : 10वी च्या पेपर दिवशीच वडिलांचा मृत्यू; न खचता लेकीने लिहला पेपर; प्राचीच्या धिराचं कौतुक करावं तेवढं थोडंच

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यात 10 वीच्या परीक्षा सुरु झाल्या (SSC Exam 2023) आहेत. अशातच महत्वाच्या इंग्रजी विषयाच्या पेपरच्या दिवशी वडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर आली. याची माहिती मिळताच संपूर्ण कुटुंब आणि ग्रामस्थांमध्ये शोक पसरला. याचवेळी घरात वडिलांच्या अंत्यविधीची लगबग सुरु असताना त्याच दिवशी मुलीचा दहावीचा इंग्रजीचा पेपर असल्याने तिच्या जोवची घालमेल सुरु होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेवून कुटुंबियांनी तिला धीर देत परीक्षेला जाण्यासाठी प्रवृत्त केलं. घरात वडिलांचा मृतदेह असताना मोठ्या धैर्याने तिने पेपर दिला. भंडारा जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या प्राची राधेश्याम सोंदरकर या मुलीबाबत हा मन सुन्न करणारा प्रसंग घडला आहे.

गेल्या महिन्यात झाला होता अपघात (SSC Exam 2023)

सोंदरकर कुटुंबीय भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील सोनी-संगम इथले रहिवासी आहेत. राधेशाम सोंदरकर हे प्राचीचे वडील. त्यांचा गेल्या महिन्यात अपघात झाला होता. महाशिवरात्रीच्या दिवशी लाखांदूरवरुन घरी जात असताना मेंढा फाट्याजवळ अज्ञात चारचाकी वाहनाने धडक दिल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. राधेशाम यांना दोन मुली असून, मोठी मुलगी दहावीत तर लहान मुलगी इयत्ता सातवीत शिक्षण घेत आहे.

गंभीर वातावरणात सुरु होता अभ्यास

एकीकडे राधेशाम यांच्यावर नागपुरात उपचार सुरु असतानाच तोंडावर दहावीची परीक्षा होती. घरातील कर्त्या पुरुषाचा अपघात झाल्याने घरात शोकाकूल वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, मुलीने या संकटकाळात खचून न जाता, वडिलांनी मुलींनाच मुलासमान जपत, “पोरी, अभ्यास कर, (SSC Exam 2023) उच्चशिक्षण घेऊन पुढे जा, खूप मोठी हो, स्वत:च्या पायावर उभी रहा,” हा वडिलांनी सांगितलेला कानमंत्र लक्षात ठेवत दहावीच्या परीक्षेची तयारी चालू ठेवली. वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घरातील गंभीर वातावरणातही प्राची दिवस रात्र अभ्यास करत होती.

सकाळी 6 वाजता बातमी येवून धडकली (SSC Exam 2023)

अशातच सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मोबाईल खणाणला आणि प्राचीने फोन उचलला. वडिलांच्या मृत्यूची बातमी कानावर पडताच मुलगी नि:शब्द झाली. वडिलांच्या मृत्यूची बातमी गल्लीत वाऱ्यासारखी पसरली, शेजारी एकवटले, बघता-बघता घरासमोर गर्दी झाली, शोकाकूल (SSC Exam 2023) वातावरणात आई, आजी, काका, काकू, लहान बहीण सगळे शोक करु लागले. वडिलांच्या अचानक जाण्याने प्राचीचा धीर खचला होता. वडिलांच्या दु:खाचे ओझे मनावर बांधूनच प्राचीने न रडता आपले ध्येय पूर्ण करायचे ठरवले. परीक्षेला जाण्याची तयारी करून तीने देसाईगंज वडसा येथील परीक्षा केंद्र गाठलं. यावेळी तिला तीच्या घरच्यांनी खंबीर साथ दिली.

शिक्षकांनी दिला आधार

प्राचीच्या हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रा. दामोधर सिंगाडे यांना घटनेची माहिती झाल्याने त्यांनी प्राचीला पेपर सोडवण्यासाठी धीर देऊन वडिलांची स्वप्नपूर्ती करण्यास (SSC Exam 2023) सांगितलं. प्राचीने देखील घरी वडिलांचा अंत्यविधी असताना तिने धैर्याने इंग्रजी विषयाची परीक्षा दिली आहे. प्राचीचा हा धाडसी निर्णय तमाम विद्यार्थी वर्गाला प्रेरणा देणारा आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com