SPMCIL Recruitment 2024 : 10 वी पास ते पदवीधारकांसाठी सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेसमध्ये विविध (SPMCIL Recruitment 2024) सरकारी पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

१० वी, पदवीधर आणि आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीची ही एक मोठी संधी चालून आली आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत सुपरवाइजर, ज्युनियर ऑफिस असिस्टंट, फायरमनसह ९६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी 15 एप्रिल 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. जाणून घेवूया भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फीसंदर्भात सविस्तर माहिती…

संस्था – सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
भरले जाणारे पद आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सुपरवाइजर – ०२ पदे
प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/BSc (Printing Technology)
2. सुपरवाइजर (Tech-Control) – ०५ पदे
प्रथम श्रेणी डिप्लोमा (Printing/Mechanical/Electrical/Electronics/ Computer Science/ Information Technology) किंवा B.Tech/B.E/BSc (Printing / Mechanical / Electrical/ Electronics /Computer Science/Information Technology)
3. सुपरवाइजर (OL) – ०१ पद
ITI- NCVT / SCVT (Printing trade -Litho Offset Machine Minder / Letter Press Machine minder/Offset Printing/Platemaking/ Electroplating) किंवा ITI (Plate Maker cum impositer/Hand composing) किंवा प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा

4. ज्युनियर ऑफिस असिस्टंट -१२ पदे (SPMCIL Recruitment 2024)
NCVT/SCVT ITI (Fitter)
5. ज्युनियर टेक्निशियन (Printing/Control)- ६८ पदे
NCVT/SCVT ITI (Welder)
6. ज्युनियर टेक्निशियन (Fitter) -०३ पदे
NCVT/SCVT ITI (Electronics/Instrumentation)

7. ज्युनियर टेक्निशियन (Welder)- ०१ पद
हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
8. ज्युनियर टेक्निशियन (Electronics/Instrumentation) – ०३ पदे
५५ टक्के गुणांसह पदवीधर आणि संगणक ज्ञान तसेच इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. /हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
9. फायरमन -०१ पद
१० वी उत्तीर्ण, फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र आणि उंची १६५ सेमी आणि छाती ७९-८४ सेमी.

वय मर्यादा – (SPMCIL Recruitment 2024)
१८ ते ३० वर्षे
SC/ST: ५ वर्षे सूट
ओबीसी – ०३ वर्षे सूट
अर्ज फी –
खुला/ ओबीसी/ EWS – ६०० रुपये.
मागासवर्गीय/ PWD – २०० रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण भारत

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट –
https://spphyderabad.spmcil.com/en/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com